Video : मुंबई गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद! नियंत्रम सुटलं आणि धड्यॅsssम

Mumbai Goa Highway Accident : पाच ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

Video : मुंबई गोवा महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद! नियंत्रम सुटलं आणि धड्यॅsssम
थोडक्यात वाचला..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 1:43 PM

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचं (Sindhudurg Accident News) सत्र सुरुच आहे. आता तर मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) हा चौपदरी झाल्यापासून या महामार्गावरील वाहनांचा वेगही वाढलाय. कमी वेळ लागावा म्हणून केलेल्या चौपदीर हायवेवर आता वाहनचालकांना वेगाची मर्यादा घालण्याची गरज सिंधुदुर्गात झालेल्या अपघातामुळे व्यक्त केली जाते आहे. एका महिंद्रा स्कॉर्पियो (Mahindra Scorpio) कारचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओरेस पीठजवळील नदी पुलावर स्कॉर्पियोचा वेग चालकाला नियंत्रित करता आला नाही आणि स्कॉर्पियो थेट हायवेच्या डाव्या बाजूला असलेल्या संरक्षक पट्टीला जाऊ धडकली. काळजाचा ठोका चुकावणारा असा हा अपघाताचा व्हिडीओ होता. सुदैवानं यावेळी हायवेवरुन दुसरं कोणतंही वाहनं आणि माणूस नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. थोडक्यात या कारचालकाचा जीवही वाचल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलंय. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, हे या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अधोरेखित होतंय.

भरधाव वेगानं स्कॉर्पियो येत असताना पाहायला मिळाली आहे. एका तीव्र वळणावर आधी ही स्कॉर्पिओ कार डिव्हायरवरच चढते. नेमक्या याच वेळी हायवेवरुन एक रिक्षा आणि बाईकही जात असते. भरधाव स्कॉर्पियो बाईक किंवा रिक्षाला जोरदार धडक देऊन पलटी होते की काय, अशी भीती व्हिडीओमध्ये दिसून आली आहे. पण पाण्यावरुन स्किड होत स्कॉर्पिओ चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाते. वेडीवाकडी वळणं घेत की गाडी रस्त्यावर सुदैवानं बाईकलाही धडक देत नाही आणि रिक्षालाही धडक देत नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळतो.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

पाच ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. त्यानंतर आता या मार्गावरील वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग आता पहिल्यापेक्षा अधिक वेगवान झाला असून चौपदरीकरणामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे.

अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे वाहनं चालवून मुंबई गोवा महामार्गावर याआधीही अनेक अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अपघाताचं हे सत्र सुरुच असल्याचं आता स्कॉर्पिओच्या अपघातामुळे पुन्हा अधोरेखित झालं आहे. दैवं बलवत्तर म्हणून थोडक्यात या अपघातातून चालक बचालवलाय. मात्र या अपघातावेळी चालकानं मृत्यू अगदी आपल्या डोळ्यांसमोर पाहिला होता. सुरक्षा पट्टीला गाडी धडकल्यानंतर ही स्कॉर्पिओ महामार्गाच्या विरुद्ध दिशेनं तोंड करुन अखेर थांबली होती. एका दुकनात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.