Mumbai : मुंबईत बसच्या पायरीवर उभा राहून प्रवास, टेम्पो गेला घासून, मग…

ट्रकच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. एक पथक चालकाला पकडण्यासाठी रवाना झालं आहे.

Mumbai : मुंबईत बसच्या पायरीवर उभा राहून प्रवास,  टेम्पो गेला घासून, मग...
Best Bus
| Updated on: Mar 16, 2023 | 12:00 PM

मालाड : मुंबईच्या (Mumbai) मालाड (Malad area) परिसरात एक अपघात झाला, त्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मोहम्मद नसीम असं त्या व्यक्तीचं नाव असून तो कपडे शिलाईचं काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे. तो बसच्या पायऱ्यावर उभा होता. ज्यावेळी कांदिवलीमधून (kandivali) बंदोंगरी बस स्थानकाच्या दरम्यान मृत व्यक्तीला एका गाडीने त्याला धडक मारली, त्यावेळी त्याचं नियंत्रण सुटल्यामुळे तो खाली पडला. त्याचवेळी बसचा मागचा टायर त्याच्या अंगावरुन गेला. त्यांनतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टेम्पोच्या चालकाचा शोध घेत आहेत.

पोलिस चौकशीत गुंतले

ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे. मालाड पूर्व येथील रहिवासी प्रमोद शर्मा (33) हे आपल्या कामाच्या ठिकाणी निघाले होते. त्यावेळी शर्मा सुध्दा बसमधून पडले. त्यावेळी त्यांना किरकोळ जखम झाली आहे. समता नगर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांच एक पथक टेम्पोच्या चालकाचा शोध घेत आहे. सीसीटिव्हीच्या माध्यमातून चालकाचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. ज्यावेळी टेम्पोने धडक दिली. त्यावेळी दोघेजण बसमधून खाली पडले.

नसीमचा भाऊ मोहम्मद गुलाबलरला ज्यावेळी या दुर्घटनेबाबत पोलिसांचा फोन आला, त्यानंतर त्याला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मोहम्मद गुलाबलर हा शताब्दी रुग्णालयात दाखल झाला. ट्रकच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. एक पथक चालकाला पकडण्यासाठी रवाना झालं आहे.