AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

Aimim : एमआयएमच्या एका बड्या नेत्याने लोकसंख्येबाबत मोठे विधान केले आहे. "हम दो, हमारे दो दर्जन" असं या नेत्याने म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हम दो, हमारे दो दर्जन... ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
Shaukat AliImage Credit source: Google
| Updated on: Feb 09, 2026 | 5:54 PM
Share

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात लग्न 19 ते 25 वय असताना करावे आणि जोडप्याला तीन मुले असावीत. यामुळे पालकांचे आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असं विधान केले होते. यानंतर आता असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमच्या नेत्याने लोकसंख्यवाढीबाबत अजब नारा दिला आहे. उत्तर प्रदेशचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी मुरादाबाद येथील एका सभेत बोलताना “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हम दो, हमारे दो दर्जन

शौकत अली यांनी मुरादाबाद येथील सभेत “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, मला आठ मुले आहेत, आणि माझ्या मोठ्या भावाला 16 मुले आहेत. आम्ही सर्व मुस्लिमांना शक्य तितकी मुले जन्माला घालण्यास उद्युक्त करू. अल्लाह देत असल्याने, घेत राहा. जोपर्यंत तो देत राहतो तोपर्यंत घेत राहा. देशातील काही लोकांना काळजी आहे की आपली लोकसंख्या वाढत आहे, परंतु जर लोकसंख्या वाढली तर देश अधिक मजबूत होईल.’

शौकत अली यांच्या भारताची चीनशी तुलना

शौकत अली यांनी भारताची तुलना चीनशी केली. ते म्हणाले की, “चीनची लोकसंख्या जास्त आहे आणि ती बलवान आहे. म्हणून, जर आपली लोकसंख्या वाढली तर आपला देश बलवान होईल. ‘आम्ही दोन, आमचे दोन डझन,’ लोकांना आपल्या लोकसंख्येची समस्या का आहे? लोकांना आपल्या संख्येची काळजी का वाटते? जे लग्न करत नाहीत तेच हिंदू बांधवांना चार मुले असावीत असा सल्ला देतात. आम्ही म्हणतो, हिंदू बांधवांना चार नाही तर चौदा मुले असावीत, जेणेकरून देश बलवान होईल.”

पुढे त्यांनी मॉब लिंचिंग आणि मुस्लिमांच्या छळावर भाष्य केले. अली म्हणाले की, “हिंदू संघटनांशी संबंधित महिलांनीही मुस्लिमांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या मदरशांना दहशतवादाचे अड्डे म्हटले जात आहे. आमच्या मुलींचे हिजाब सार्वजनिक ठिकाणी काढून टाकले जात आहेत. आमची दाढी उपटली जात आहे. लोक सुरक्षित नाहीत.”

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...