भाड्याचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक, हेवी डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट

| Updated on: May 31, 2023 | 1:50 PM

दोघी महिलांना घर भाड्याने हवे होते. त्यासाठी त्यांनी एजंटशी संपर्क साधला. एजंटने त्यांची दोघांशी ओळख करुन दिली. त्या दोघांनी आपला हेतू साध्य केला.

भाड्याचे घर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक, हेवी डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट
भाड्याने घर मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन महिलांची फसवणूक
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : घर भाड्याने देण्याच्या बहाण्याने दोन महिलांची 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुंबईतील अंधेरीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र म्हसकर आणि वैभव म्हसकर अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवचे यापूर्वीही अशाच गुन्ह्यात नाव असून, तो सध्या जामिनावर बाहेर आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 420 (फसवणूक) आणि 34 अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. मॅरिग्रेस प्रीतम आणि ज्युली डिसिल्वा अशी फसवणूक करणाऱ्या महिलांची नावे आहेत.

भाड्याने घर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरिग्रेस प्रीतम या महिलेने जानेवारीमध्ये कांदिवलीच्या गुडावली येथील धिवटे चाळीमध्ये घर भाड्याने घेण्यासाठी एजंटशी संपर्क साधला होता. त्यानंतर एजंटने तिची दोघांशी ओळख करून दिली. जानेवारीमध्ये, आरोपीने मॅरिग्रेसला सांगितले की, एक भाडेकरू घरात राहत आहे. परंतु तिच्या मुलाकडे मालमत्तेचे मुखत्यारपत्र असल्याने ती व्यक्ती लवकरच घर सोडेल असे आश्वासन त्याने दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने तीन लाख रुपये हेवी डिपॉझिट म्हणून आरोपीला दिले.

महिलेच्या नातेवाईकाचीही फसवणूक

नंतर, भाडेकरूने सोडण्यास नकार दिल्याने मॅरिग्रेसने पैसे परत मागितले, परंतु ते मिळाले नाही. महिलेने सांगितले की, आरोपीने तिची नातेवाईक ज्युली डिसिल्वाचीही आरोपींनी अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. ज्युलीलाही भाड्याने घर मिळवून देण्याच्या बहाण्याने गंडा घातला. ज्युली यांच्याकडून आरोपींनी 5 लाख रुपये घेतले. मात्र ते परत दिलेच नाहीत.

हे सुद्धा वाचा