AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधवा महिलेशी लग्न करायचा आणि…; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक

मुंबईतील अंधेरीत एका ५१ वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेशी लग्न करून तिचे दागिने चोरण्याची घटना घडली. प्रमोद नाईक नावाच्या या आरोपीने पुण्यातील एका सोन्याच्या कंपनीला दागिने विकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.

विधवा महिलेशी लग्न करायचा आणि...; मुंबईतील अट्टल चोराला पुण्यातून अटक
प्रातनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 17, 2025 | 1:54 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात एका विधवा महिलेशी लग्न करुन तिचे दागिने घेऊन पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद नाईक (51) असे या आरोपीचे नाव आहे. दिंडोशी पोलिसांनी घटना घडल्यानंतर 15 दिवसांनी पुण्यातून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नाईक विधवा महिलेशी लग्न करुन मुंबईहून पळ काढला होता. त्याने तिचे सोन्याचे दागिने चोरले होते. यानंतर त्याने चोरीचे सोन्याचे दागिने पुण्यातील एका सोन्याच्या कर्ज कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्याची अपेक्षित किंमत मिळाली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या खरेदीदाराचा शोध घेत होता. यादरम्यान पोलीस हे आरोपीचा शोध घेत होते.

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम जप्त

पोलीस तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की आरोपी पुण्यातील बाणेर परिसरात आहे. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अंदाजे २९.५ तोळे सोने, १.५ किलो चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम जप्त केली. प्रमोद नाईकने हा सर्व मुद्देमाल त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मालाड येथील घरातून चोरला होता. प्रमोदने त्यांच्या दुसऱ्या पत्नीला सांगितले होते की त्याची पहिली पत्नी आणि दोन मुले यांचा कोविडदरम्यान मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात ते अजूनही जिवंत आहेत आणि मुंबईतील गिरगाव येथे राहतात. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे.

…अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या

प्रमोद नाईकवर मालाडमधील एका इव्हेंट कंपनीत काम करत होता. या ठिकाणी त्याने फसवणूक केली होती. त्याने त्याच्या खात्यात २५ लाख रुपये फसवणूक करुन ट्रान्सफर करुन घेतले होते, असा आरोप त्याच्यावर होता. तपासादरम्यान असे आढळून आले की प्रमोद नाईक ४५-५५ वयोगटातील विधवांची मॅट्रिमोनियल साइट्सवरुन माहिती काढायचा. लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करायचा. गेल्या महिन्यात एका ५० वर्षीय महिलेला त्याने फसवले होते. प्रमोद नाईक चार ते पाच महिलांच्या संपर्कात होता आणि त्यांच्याशी लग्न करून त्यांना अशाच प्रकारे फसवण्याचा त्याचा हेतू होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण