मुंबईच्या शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेने 16 वर्षाच्या मुलाला सेक्ससाठी कसं तयार केलं? 5 धक्कादायक तथ्य समोर
मुंबईत एका हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. शाळेतल्या शिक्षिकेनेच एका 16 वर्षाच्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. शिक्षिकेने या मुलाला कसं तयार केलं? त्या बद्दलची पाच धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.

मुंबईच्या नामवंत शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवून सोडलय. एक 40 वर्षीय शिक्षिका 16 वर्षाच्या मुलावर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत होती. भारतात गुरु-शिष्याची एक मोठी परंपरा आहे. गुरुबद्दल फक्त विद्यार्थ्यांच्या मनातच नाही, तर पालकवर्ग, समाजात एक आदराची भावना असते. गुरु-शिष्याच नातं पवित्र मानलं जातं. पण मुंबईच्या एका नामवंत शाळेतील शिक्षिकेने या पवित्र नात्याला कलंक लावण्याच काम केलं. शिक्षक या शब्दाचा अर्थच या महिलेला समजला नाही. ही महिला दिवसा या मुलाला शाळेत शिकवायची. नंतर त्याला मुंबईतील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायची. हा मुलगा घाबरु नये म्हणून त्याला काळजी वाटू नये, यासाठी चिंता कमी करणाऱ्या गोळ्या द्यायची.
या 16 वर्षीय मुलाच्या वागण्याबोलण्यात, वर्तनात होणारा बदल लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्याला खोदून, खोदून विचारलं, त्यावेळी हा खळबळजनक प्रकार समोर आला. या शिक्षिकेच्या अटकेनंतर लैंगिक अत्याचाराबद्दलची धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.
1) हा शिक्षिका विवाहित असून तिला मुलं आहेत. डिसेंबर 2023 मध्ये शाळेच स्नेह सम्मेलन तसच विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षिका आणि मुलाचा संपर्क आला. शिक्षिका त्या मुलाकडे आकर्षित झाली, असं तक्रारदाराने म्हटलं आहे. ओळख झाल्यानंतर महिन्याभरानंतर दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले.
2) मुलगा सुरुवातीला अशा गोष्टीसाठी तयार नव्हता. तो शिक्षिकेला टाळत होता. मुलाची एक मैत्रीण होती, तिच्या माध्यमातून शिक्षिकेने हे नातं स्वीकारण्यासाठी मुलाला भाग पाडलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलय.
3) या मैत्रिणीने मुलाला शिक्षिकेसोबतच नातं स्वीकारण्यासाठी तयार केलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं. प्रौढ महिला आणि किशोरवयीन मुलगा यांच्यातील अफेअर आता सामान्यबाब झाल्याच सांगणाऱ्या मुलाच्या मैत्रिणीवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय.
4) महिला मैत्रिणीने मळ वळवल्यानंतर मुलगा शिक्षिकेला भेटायला तयार झाला. तिने तिच्या सेडान गाडीत मुलाला बसवलं. निर्जनस्थळी ती मुलाला घेऊन गेली. तिथे जबरदस्तीने त्याला कपडे उतरवायला लावले. नंतर त्याच्यावर अत्याचार केले असं अधिकाऱ्याने सांगितलं.
5) त्यानंतर ती शिक्षिका मुलाला घेऊन महागड्या हॉटेलमध्ये जायची. तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायची. वारंवार असं होऊ लागल्याने मुलामध्ये काळजी, चिंता वाढली. तिने त्यानंतर मुलाला चिंता कमी करणाऱ्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. अत्याचार करण्याआधी ती मुलाला दारु प्यायला सुद्धा लावायची असं तक्रारदाराने म्हटलय.
