Goa Criminal Arrest : मुंबईतील मोस्ट वाँटेड गुन्हेगार विक्रांत देशमुखला बंदुकीसह अटक, पणजी पोलिसांची कारवाई

| Updated on: Jul 31, 2022 | 4:25 PM

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. काल तो पणजी येथील कॅसिनोमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पणजी पोलिसांना मिळाली होती.

Goa Criminal Arrest : मुंबईतील मोस्ट वाँटेड गुन्हेगार विक्रांत देशमुखला बंदुकीसह अटक, पणजी पोलिसांची कारवाई
सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Image Credit source: tv9
Follow us on

गोवा / देवेंद्र वालावलकर (प्रतिनिधी) : मुंबईतील मोस्ट वाँटेड गुन्हेगार विक्रांत देशमुख उर्फ विक्की (Vicky)ला पणजी पोलिसांनी उत्तर गोव्यातून शनिवारी रात्री उशिरा अटक (Arrest) केली आहे. पणजी येथील एका कॅसिनो परिसरातून विक्कीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी विक्कीचा एक साथीदारही त्याच्या सोबत होता. मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला. विक्की आपल्या पूर्ण कुटुंबासोबत गोव्यात आला असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला. उत्तर गोव्यातील पणजी पोलिसां (Panaji Police)नी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत मुंबई महाराष्ट्रातील मोस्ट वाँटेड गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. विक्रांत उर्फ विक्की विरोधात महाराष्ट्र राज्यात 33 हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. सध्या तो मुंबईतील पीएस नेरुळ येथे खून आणि मोक्का प्रकरणात पोलिसांना हवा आहे.

गुप्त माहितीनुसार पणजीतील कॅसिनोतून विक्कीला अटक

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. काल तो पणजी येथील कॅसिनोमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती पणजी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार, पणजीचे पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर पणशीकर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन गोवकर, आदित्य म्हार्दोळकर, मनोज पेडणेकर, परेश बुगडे आणि रामा घाडी यांच्या पथकाने सापळा रचून विक्कीला जेरबंद केले. पणजी पोलिसांच्या पथकाने त्याला पाठलाग करून पकडले. विक्की आपल्यासोबत प्राणघातक शस्त्र घेऊन येण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून पाच जिवंत राउंड/काडतुसे असलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल, मोबाईल फोन आणि टोयोटा फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात पणजी पोलिसांनी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पणजी पोलिसांनी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाच्या समन्वयाने ही कारवाई केली. (Mumbais most wanted criminal Vikrant Deshmukh was arrested by the Panaji police with a gun)

हे सुद्धा वाचा