
अनेकदा पती-पत्नी यांच्या संसारात अनेक कारणाने वादविवाद होत असतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की त्यातून घरात अशांतता वाढते. अशाच एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक हैराण करणारे प्रकरण घडले आहे. येथे एका पोलिस शिपायाला ड्यूटीवर उशीरा पोहचल्याने वरिष्ठांनी झापले असता त्याने आपली पत्नी स्वप्नात माझ्या छातीवर बसते आणि माझे रक्त पिण्याचा प्रयत्न करते,त्यामुळे मी रात्रीचा नीट झोपू शकत नाही असे उत्तर दिल्याने खळबळ उडाली आहे.
मेरठमधील ४४ व्या वाहिनी पीएसीच्या जवानाला ड्यूटीवर उशीरा पोहोचल्याने नोटिस पाठविण्यात आली. त्यात त्याने लिहीले की स्वप्नात पत्नी माझ्या छाताडावर बसते आणि माझं रक्त पिण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपण रात्रभर झोपू शकत नाही असे लेखी कारण दिले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रात्री झोप येत नसल्याने मी डिप्रेशनचे औषध घेत आहे. पोलिस शिपायाचे हे उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे. कमाडेन्टनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहे.
या पोलिस शिपायाने आपण डिप्रेशनचे औषधे घेत असल्याचा म्हटले आहे. माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. त्याने आता आपली जगण्याची इच्छा संपल्याचे सांगत देवाला शरण जाण्याचा मार्ग विचारला आहे. पीएसी कमाडन्ट सत्येंद्र पटेल यांनी सांगितले की या व्हायरल पत्राची चौकशी केली जात आहे. पोलिस जवानाच्या मानसिक स्थितीचा देखील तपास केला जाईल. आणि आवश्यकता वाटेल तेव्हा पोलीस खात्यांर्गत मदत देखील केली जाईल असे वरिष्ठ पोलिसांनी म्हटले आहे.
44 वी वाहिनी पीएसीचे कमांडन्ट सत्येंद्र पटेल यांनी मान्य केले की अशी चिट्ठी व्हायरल झाली आहे. त्याची चौकशी होत आहे. कोणता स्टाफ आहे त्याची काय समस्या आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असेल जर आवश्यकता वाटत असेल तर या प्रकरणात कौन्सिलींग देखील केले जाईल. जर कोणाला विभागीय मदत हवी असेल ती देखील दिली जाईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.