AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, गायीला बेशुद्ध करून चोरण्याचा प्रयत्न, काय घडलं नेमकं?

जावसई परिसरातून आत्तापर्यंत अशाच पद्धतीने अनेक गाईंची चोरी करण्यात आली असून गोहत्या करून गोमास विक्रीसाठीच या चोऱ्या करण्यात आल्याचा गाय मालकांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गाय मालक आणि स्थानिकांनी केली आहे.

धक्कादायक, गायीला बेशुद्ध करून  चोरण्याचा प्रयत्न, काय घडलं नेमकं?
| Updated on: Feb 28, 2025 | 5:13 PM
Share

गोहत्या सुरक्षा कायदा असून अनेक जण गायीची तस्करी करीत असतात. असाच गायी चोरण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या प्रसंगावधानाने थोडक्यात टळला असून गायींचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. या गायींना बेशुद्ध करुन चोरटे त्यांना पळविण्याचा बेत होता. या प्रकरणात दोघे जण घटनास्थळावरुन पसार झाले आहे. तर एकाला अटक करण्यात यश आले आहे. काय नेमके घडले हे पाहूयात…

गोहत्या कायदा अस्तित्वात असून अनेकजण गायींच्या तस्करीत गुंतलेले असतात. या गायींना चक्क बेशुद्ध करुन त्यांना कत्तलखान्यात नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतू एका तरुणाने चाणाक्षपणा दाखविल्याने या गायींची गुन्हेगारांच्या तावडीतून सुटका होण्यात मदत झाली आहे. अंबरनाथ येथील जावसई परिसरातील वाघवाडीत एक धक्क्दायक प्रकार उघडीस आला आहे. वाघवाडीत तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे यांच्या गायी त्यांना चरण्यासाठी सोडल्या होत्या. या गायींना बेशुद्ध करुन त्यांना टेम्पोत घालून नेण्याचा डाव या तरुणांच्या सर्तकतेमुळे उद्धवस्थ झाला आहे.

अंबरनाथ येथे गाईला बेशुद्ध करून कत्तल खाण्यात नेणाऱ्याला स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं आहे. या तरुणापैकी दोन तरुण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. एका चोरला पकडण्यात यश आले आहे. त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वाघवाडीत राहाणारे तुषार लोंढे यांनी चरण्यासाठी गायी सोडल्या होत्या. या गायींना परत आणण्यासाठी रात्री ८ वाजताच्या सुमारास तुषार लोंढे घटनास्थळी गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या ३ गायी सापडल्या नाहीत. मग शोधाशोध सुरु केले तेव्हा ३ इसम अक्षय वाघचौरे यांच्या एका गाईला ब्रेड खाऊ घालत असल्याचे त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी तातडीने अक्षय यांना फोन करून तिथे बोलावलं असता ते तिघेही गायचोर तिथून पळून गेले.

तिघे गायचोर तिथून पळून गेले

अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई परिसरातील वाघवाडीत तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे हे वास्तव्याला आहेत. या दोघांच्याही घरी असलेल्या गाईंना त्यांनी चरण्यासाठी सोडलं होतं. रात्री ८ वाजताच्या सुमारास तुषार लोंढे हे त्यांच्या गाईंना परत आणण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या ३ गायी सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली असता ३ इसम अक्षय वाघचौरे यांच्या एका गाईला ब्रेड खाऊ घालत असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी तातडीने अक्षय यांना फोन करून तिथे बोलावलं असता ते तिघे गायचोर तिथून पळून गेले. तोपर्यंत त्यांची गाय बेशुद्ध पडलेली होती, त्यामुळे गाईला गुंगीचं औषध देऊन चोरण्याचा डाव असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या तिघा गायचोरांची शोधाशोध सुरू केली. यावेळी गाय चोरण्यासाठी आलेले दोघे पळून गेले, तर एक इसम त्यांना सापडला. त्याला अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आणलं असता त्याने आपण कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आलो असून गोहत्या करण्यासाठी आपण गाय चोरत असल्याची कबुली दिली.

साथीदारांचा शोध सुरु

या गाईवर उपचार करून तिला तातडीने शुद्धीत आणण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची दुचाकी तपासली असता त्याच्या डिक्कीत बल्ब, ब्रेडचं पाकीट, पाईप, स्क्रू ड्रायव्हर असं साहित्य आढळून आलं आहे. ब्रेडवर गुंगीचं औषध टाकून ते गाईला खाऊ घालायचं आणि गाय बेशुद्ध पडली, की आपल्या साथीदारांना बोलावून कारमध्ये भरून गाय कत्तलखान्यात नेऊन तिची विक्री करायची, अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात असलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तर त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.