AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील ‘त्या’ खुनाचा उलगडा

प्रेमसंबंध असलेली शेजारची महिली दुसऱ्यांकडे पाहते, याचा राग धरत आरोपीने त्या  महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. (kalyan man killed woman sex relationship)

माझ्यावर प्रेम अन् दुसऱ्यांकडे पाहते म्हणून महिलेची हत्या, सापर्डेतील 'त्या' खुनाचा उलगडा
आरोपी पवन
| Updated on: Feb 22, 2021 | 11:11 PM
Share

ठाणे : कल्याणमधील सापर्डे (kalyan saparde murder) येथे हळदी समारंभादरम्यान झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला आहे. प्रेमसंबंध (ex relationship) असलेली शेजारची महिला दुसऱ्यांकडे पाहते याच गोष्टीचा राग मनात धरत आरोपीने त्या  महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या 4 तासांत पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. सध्या आरोपी पवन म्हात्रे पोलिसांच्या ताब्यात आहे. (mystry of kalyan saparde murder revealed, man killed woman because of sex relationship)

नेमका प्रकार काय ?

कल्याणमधील सापर्डे गावात हळदी समारंभ सुरु होता. यावेळी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सगळे हळदी समारंभात व्यस्त होते. यावेळी आरोपी पवन म्हात्रेने शेजारच्या महिलेवर हल्ला केला. यावेळी आरोपीची आईसुद्धा हजर होती. हल्ला झाल्यानंतर शेजारच्या महिलेला वाचविण्यसाठी आरोपीची आई धावत गेली होती. या हल्ल्यात पवनची आईसुद्धा जखमी झाली तर हल्ला झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकारामुळे सापर्डे गावात खळबळ उडाली होती.

खुनाचा उलगडा कसा झाला?

पवनच्या घराशेजारील महिलेवर हल्ला झाल्यानंतर हा हल्ला चोरीच्या उद्देशातून झाल्याचा बनाव पवनने केला. यावेळी पवनही तेथे उपस्थित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, या हल्ल्यात आरोपी पवन हा तिळमात्र जखमी झाला नव्हता. या प्रकारामुळे पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला होता. त्या दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला. कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार आणि सीनियर पीआई अशोक पवार या तिघांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जवळपास तीन तास आरोपी पवनची कसून चौकशी केली. त्यांनतर आपणच त्या महिलेची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.

हत्या करण्याचे कारण काय?

चौकशीनंतर आरोपी पवन म्हात्रे याने खळबळजनक खुलासे केले. आपणच मृत महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचे त्याने कबुल केले. यावेळी पुढे सांगताना पवन आणि मृत्यू झालेली शेजारची महिला यांचे प्रेम संबंध होते. मात्र शेजारची महिला इतरांसोबतही मिळून मिसळून राहत असे. याच कारणामुळे माझ्यावर प्रेम आणि दुसऱ्यांकडे बघते, या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पवनने महिलेची हत्या केली.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात पवनकडे एक पिस्तुलसुद्धा सापडले आहे. या सर्व प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत.

इतर बातम्या :

धक्कादायक! सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागलेल्या पीडितेची तक्रार, 2 आरोपींवर बलात्काराचा गुन्हा

अखेर कुख्यात गुंड रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात, उद्या किल्ला कोर्टात हजर करणार

(mystry of kalyan saparde murder revealed man killed woman because of sex relationship)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.