धक्कादायक ! कुत्र्याने घाण केल्यामुळे राग अनावर, महिलेवर थेट कुऱ्हाडीने हल्ला

क्षुल्लक कारणावरुन एकाने महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. (Nagpur man attacked woman axe)

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 18:22 PM, 22 Feb 2021
धक्कादायक ! कुत्र्याने घाण केल्यामुळे राग अनावर, महिलेवर थेट कुऱ्हाडीने हल्ला
सांकेतिक फोटो

नागपूर : राग न आवरता आल्यामुळे अनेकांच्या हातून भयंकर गुन्हे घडतात. नागपूर जिल्ह्यातील सावनेर या गावातसुद्धा असाच एक विचीत्र गुन्हा घडला आहे. क्षुल्लक कारणावरुन एकाने महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झालीये. (Nagpur man attacked woman with axe women highly injured)

कुऱ्हाडीने हल्ला, महिला गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील सावनेर या गावात आरोपी इंद्रलाल नवरे आणि जखमी झालेली महिला सोनू उईके या दोघाचे एकमेकांच्या शेजारी घरं होती. सोनू उईके यांच्या घरी त्यांनी एक कुत्रा पाळला होता. या कुत्र्याने इंद्रलाल नवरे यांच्या घरी जाऊन घाण केली. याच गोष्टीमुळे इंद्रलाल नवरे आणि सोनू उईके यांच्यात वाद झाला. हा वाद नंतर एवढा टोकाला गेला की, रागाच्या भरात इंद्रलाल नवरे याने सोनू उईके यांच्यावर कुऱ्हाडीने थेट हल्ला केला. हा हल्ला इतका विदारक होता की, यामध्ये सोनू उईके गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर, हा प्रकार घडल्यानंतर सावनेर या गावात सर्वत्र खळबळ उडाली. सोनू उईके जखमी झाल्याचे समजताच शेजारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची स्थिती सध्या गंभीर आहे.

आरोपीला अटक

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सोनू उईके यांच्या कुटुंबीयांनी इंद्रलाल नवरे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी इंद्रलाल याला अटक केली आहे. मात्र, कुत्र्याने घाण करण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे थेट कुऱ्हाडीने हल्ला केल्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरु आहे.

इतर बातम्या :

तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

दुकानदाराचा हलगर्जीपणा लहान मुलाच्या जीवावर बेतला, विजेचा धक्का लागून अवघ्या 10 मिनिटात मृत्यू

चारित्र्यसंपन्नता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागलेल्या प्रकाराला नवं वळण!

(Nagpur man attacked woman with axe women highly injured)