धक्कादायक! कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न

भंडाऱ्याच्या केसलवाडा येथील आरोपी कार्तिक बकाराम मेश्राम हा जिल्हा कारागृहात (Police Beaten By Prisoner) न्यायाधीत बंदी म्हणून शिक्षा भोगत आहे.

धक्कादायक! कारागृहात कैद्याची पोलिसाला मारहाण, दगड उचलून जीवे मारण्याचाही प्रयत्न
Bhandara District Jail

भंडारा : भंडारा जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या न्यायाधीन कैद्याने इतर कैद्यांसह (Police Beaten By Prisoner) पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत भंडारा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Police Beaten By Prisoner).

भंडाऱ्याच्या केसलवाडा येथील आरोपी कार्तिक बकाराम मेश्राम हा जिल्हा कारागृहात (Bhandara District Jail) न्यायाधीत बंदी म्हणून शिक्षा भोगत आहे. तो रविवारी सकाळी साडेदहा वाजता बॅरेक क्रमांक 5 मधून बॅरेक क्रमांक 7 समोर असलेल्या पटांगणात आला. त्याने कैदी किरण शिवशंकर समरीत याला उचलून जमिनीवर आपटून मारहाण केली.

त्यावेळी कारागृह पोलीस चंद्रशेखर दयाराम घरत यांनी दोघांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपीने त्यांना धक्का दिला. या घटनेनंतर दोन्ही कैद्यांना तुरुंग अधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता तेथेही पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची होत हाणामारी सुरु झाली. तेव्हा पुन्हा पोलीस कर्मचारी घरत यांनी त्यांचे भांडण सोडवण्याच्या प्रयत्न केला. पण, आरोपी मेश्राम याने पोलीस कर्मचारी घरत यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर जमिनीवरील 5 ते 7 किलो वजनाचा दगड उचलत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला.

वेळीच इतर कर्मचाऱ्यांनी आरोपी जवळील दगड हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी मेश्राम विरोधात कलम 353, 504 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे.

Police Beaten By Prisoner

संबंधित बातम्या :

नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला, कल्याणमध्ये थरार, महिलेचा मृत्यू

टिंडरवर सुंदर महिलेचा मोह महागात पडला, गळ्यावर चाकू ठेवत 55 लाख रुपयांची लूट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI