चारित्र्यसंपन्नता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागलेल्या प्रकाराला नवं वळण!

पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीनं आणि एका पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीनं केलाय.

चारित्र्यसंपन्नता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागलेल्या प्रकाराला नवं वळण!
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 3:36 PM

उस्मानाबाद : आपण चारित्र्यसंपन्न असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी समाजातील एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागला होता. जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घडला आहे. पण आता या प्रकराला एक गंभीर वळण मिळालं आहे. पीडित महिलेवर गावातील एका व्यक्तीनं आणि एका पोलीस कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडिता आणि तिच्या पतीनं केलाय.(Caste Panchayat’s inhumane judgment, a new twist to the case in Osmanabad district)

पीडित महिला आणि तिचा पती आता माध्यमांसमोर आले आहेत. गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला असून, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! नेमका प्रकार काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.

या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं!

उस्मानाबाद पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी अमानवी शिक्षा देणाऱ्यांवर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. पण आता या प्रकाराला गंभीर वळण मिळाल्यानं उस्मानाबाद पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

डायरीत 22 नोव्हेंबर 2021 पानावर सुसाईड नोट, पत्नी-दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास

Caste Panchayat’s inhumane judgment, a new twist to the case in Osmanabad district

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.