AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायरीत 22 नोव्हेंबर 2021 पानावर सुसाईड नोट, पत्नी-दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात राहणाऱ्या कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे (Ahmednagar Family Commits Suicide)

डायरीत 22 नोव्हेंबर 2021 पानावर सुसाईड नोट, पत्नी-दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास
अहमदनगरच्या कुटुंबाची आत्महत्या
| Updated on: Feb 20, 2021 | 2:30 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन गळफास घेतला. विशेष म्हणजे डायरीत 22 नोव्हेंबर 2021 या पानावर त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये आपल्या मोठ्या मुलाच्या श्रवणाच्या त्रासाचा उल्लेख केला आहे. (Ahmednagar Family Commits Suicide Dr Mahendra Thorat hangs self after killing wife children)

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात राहणाऱ्या कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन दिले. त्यानंतर गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं म्हटलं जातं.

विशेष म्हणजे गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. डायरीच्या 22 नोव्हेंबर 2021 या पानावर ही चिठ्ठी आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी “माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत” असा उल्लेख केला आहे.

आत्महत्या केलेल्यांची नावे –

महेंद्र जर्नार्दन थोरात, वय 46 वर्षाराणी महेंद्र थोरात, वय 42 कृष्णा महेंद्र थोरात, वय 16 कैवल्य महेंद्र थोरात, वय 6

(Ahmednagar Family Commits Suicide Dr Mahendra Thorat hangs self after killing wife children)

सुसाईड नोटमध्ये काय?

“आम्ही आज आपल्यापासून कायमचा निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकायला येत नाही. कृष्णाचे समाजामध्ये अपराधीपणासारखे आणि अपमानास्पद राहणे आता आम्हाला सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालेलो आहोत. कृष्णाचे पण कशात मन लागत नाही, समाधान वाटत नाही, सतत त्यालाही वाईट वाटते. परंतु तो कधी म्हणून दाखवत नाही.” असा उल्लेख डॉक्टर महेंद्र थोरात यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

“एक आई-वडील म्हणून त्याला असणारे आणि होणारे दुःख आम्ही सहन करु शकत नाही. मी आणि माझी मिसेस सौ वर्षा आम्ही दोघांनी मिळून, चर्चा करुन, विचाराने निर्णय घेत आहोत. असे कृत्य करणे आम्हालापण योग्य वाटत नाही. कृपया आम्हाला क्षमा करावी. या घटनेमुळे कोणालाही प्रत्यक्ष किमवा अप्रत्यक्षपणे दोषी समजू नये” असेही या चिठ्ठीत लिहिले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, वडिलांनी दोन चिमुकल्यांसंह संपवलं आयुष्य

पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास

(Ahmednagar Family Commits Suicide Dr Mahendra Thorat hangs self after killing wife children)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.