Pune Suicide | पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास

एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. (Pune Family Commits Suicide Couple Hangs self after killing Children)

  • अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 7:48 AM, 19 Jun 2020
Pune Suicide | पुण्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, चिमुरड्यांना संपवून दाम्पत्याचा गळफास

पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिशीतील दाम्पत्याने दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर स्वतःचंही आयुष्य संपवलं. (Pune Family Commits Suicide Couple Hangs self after killing Children)

अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत. शिंदे कुटुंब सुखसागर नगर गल्ली नं 1 मध्ये राहत होतं.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तेव्हा फॅनच्या अँगलला नायलॉनच्या दोरीने चौघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना काल (गुरुवार 18 जून) रात्री अकरा वाजताच्या सुमारास सुखसागर नगर परिसरात  उघडकीस आली.

हेही वाचा : Jalgaon Suicide | मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या, कॉलेजसमोरच्या विहिरीत उडी

अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडेंटीटी कार्ड तयार करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा प्रेम विवाह झाला होता, मात्र कुटुंबासोबत काही मतभेद असल्याचे बोलले जाते.

शिंदे दाम्पत्याने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा घोटून नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

(Pune Family Commits Suicide Couple Hangs self after killing Children)