मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, वडिलांनी दोन चिमुकल्यांसंह संपवलं आयुष्य

घरातील तिघांनी ही आत्महत्या केली असून यामध्ये वडिल आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • गोविंद ठाकरू, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 21:03 PM, 3 Dec 2020

कांदिवली : मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथं एक आत्महत्येची (Suicide) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीमध्ये (Kandivali) एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. घरातील तिघांनी ही आत्महत्या केली असून यामध्ये वडिल आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (suicide of family in Mumbai father ended his life with two girls)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील वडिल आणि दोन मुलींनी आत्महत्या केली आहे. वडिल अजगर अली जब्बार अली (वय 45) तर 12 आणि 9 वर्षांच्या दोन मुली कॅनन आणि सुजैन अशी मृतांची नावं समोर आली आहेत. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. यामध्ये कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तात्काळ कांदिवली पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर वडिलांनी मुलींसह आत्महत्या केली की आधी मुलींची हत्या करून मग आत्महत्या केली याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तर एकाच वेळी संपूर्ण कुटुंब संपल्याने नातेवाईकांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्षी आणि शेजाऱ्यांची चौकशी करणार असून नेमकं कोणतं कर्ज होतं? आणि पैशासाठी कोणी दबाव टाकत होतं का? याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा, अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेच्या विषाचा वापर

क्षणात संपवलं सात जन्माचं नातं, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचं टोकाचं पाऊल

(suicide of family in Mumbai father ended his life with two girls)