चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागलेल्या पीडितेची तक्रार, 2 आरोपींवर बलात्काराचा गुन्हा

उकळत्या तेलात हात घालावा लागलेल्या पीडित महिनेलं 2 जणांविरुद्ध बलात्काराची तक्रार केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागलेल्या पीडितेची तक्रार, 2 आरोपींवर बलात्काराचा गुन्हा
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 9:45 PM

सोलापूर : आपण चारित्र्यवान असल्याचं सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालावा लागलेल्या पीडित महिनेलं 2 जणांविरुद्ध बलात्काराची तक्रार केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हा पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेल्या तक्रारीनंतर आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तर तिच्या पतीविरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.(Rape case has been registered against two persons after a woman lodged a complaint)

पीडिता चारित्र्यसंपन्न आहे की नाही ते तपासण्यासाठी परंडा तालुक्यातील एका गावात पारधी समाजातील एकाने उकळत्या तेलात तिला हात घायला लावला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीवर आणि त्या समाजाच्या जात पंचायतीवर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र, सोमवारी सकाळी पीडित महिला आणि तिचा पती माध्यमांसमोर आला. या दोघांनी गावातील एक व्यक्ती आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकाराला नवं वळण मिळालं.

सोमवारी संध्याकाळी फिर्यादी महिलेल्या तक्रारीवरुन सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच महिलेला उकळत्या तेलात हात घालायला लावणाऱ्या पतीविरोधात जात पंचायत निर्मुलन कायदा आणि कलम 338 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली आहे.

चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! नेमका प्रकार काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पतीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.

या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं!

संबंधित बातम्या :

चारित्र्यसंपन्नता सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागलेल्या प्रकाराला नवं वळण!

Video : उकळत्या तेलात हात घालून महिलेच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! हा कसला न्यायनिवाडा?

Rape case has been registered against two persons after a woman lodged a complaint

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.