Sana Khan Murder | नर्मदा नदीपात्रात सापडलेला मृतदेह भाजपा नेत्या सना खान यांचा का?

Sana Khan Murder | सना खान या नागपूरमधील भाजपाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नेत्या होत्या. सना खान काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. अमित साहू हा जबलपूर येथील वाळू आणि दारु तस्कर आहे.

Sana Khan Murder | नर्मदा नदीपात्रात सापडलेला मृतदेह भाजपा नेत्या सना खान यांचा का?
Bjp Leader Sana Khan Murder Case
| Updated on: Aug 16, 2023 | 3:50 PM

सिहोरा : नर्मदा नदी पात्रात एक मृतदेह सापडला आहे. भारती जनता पार्टीच्या नागपूरच्या अल्पसंख्यांक विभागाच्या नेत्या सना खान यांचा तो मृतदेह असण्याची शक्यता आहे. सिहोरा गावातून वाहणाऱ्या नर्मदा नदीपात्रात हा मृतदेह सापडला आहे. अजून या बद्दल काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. सना खानचा नवरा अमित ऊर्फ पप्पू साहू या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. रॉडने प्रहार करुन सना खानची हत्या केल्याची कबुली पप्पू साहू याने दिली आहे. त्यानंतर मृतदेह हिरेन नदीत फेकून दिला.

पप्पू साहूने ज्या ठिकाणी सना खान यांचा मृतदेह फेकला, ती हिरेन नदी 3 किलोमीटरवर नर्मदा नदीला मिळते. मृतदेह हिरेन नदीतून नर्मदा नदीत वाहत आल्याची शक्यता आहे.

पप्पू साहूला कुठून अटक केली?

पप्पू साहू मागच्या अनेक दिवसांपासून अटक टाळण्यासाठी पळत होता. पण अखेरीस त्याला जबलपूर येथून अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नागपूर शहरात आणण्यात आलं. सना खान आणि अमित शाहू यांच्यात रजिस्टर्ड लग्न केलं होतं. त्यानंतर काही महिन्यातच ही घटना घडली.

दोघांमध्ये कशावरुन वाद होता?

सना खान काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. 2 ॲागस्टला त्यांची हत्या झाली. आरोपी अमित साहू आणि सना खान यांच्यात पैशावरुन वाद असल्याच बोललं जातय. त्यानंतर आरोपीने सना खान यांच्या डोक्यावर रॅाड मारला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

दोघांच रजिस्टर्ड मॅरेज

आरोपी अमित साहू हा जबलपूर येथील वाळू आणि दारु तस्कर आहे. त्याच्याशी सना खान यांनी रजिस्टर्ड मॅरेज केलं. सना खान भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी होत्या. व्यवसायातील भागिदारीवरून वाद झाल्याने अमितने सना खान यांना संपवले. अमित साहूचा चालक जितेंद्र गोंड यालाही पोलिसांनी अटक केली होती.