AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jagdeep Dhankhar: मला दाढीवाल्याची खूप भीती वाटते… तडकाफडकी राजीनामा दिलेले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य, म्हणायचं तरी काय?

Jagdeep Dhankhar big statements: तडकाफडकी राजीनामा दिलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अनेक दिवसानंतर मनातील सल बोलून दाखवली की ते सहज बोलून गेले असा प्रश्न त्यांच्या एका वक्तव्याने विचारला जात आहे. मला दाढीवाल्याची खूप भीती वाटते असं त्यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Jagdeep Dhankhar: मला दाढीवाल्याची खूप भीती वाटते... तडकाफडकी राजीनामा दिलेले माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य, म्हणायचं तरी काय?
जगदीप धनखड Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 27, 2026 | 11:52 AM
Share

Jagdeep Dhankhar big statements : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बुधवारी एक मोठं वक्तव्य केलं. राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी खासदार राम सिंह कसवा आणि आमदार रही कमला कसवा यांच्या घरी ते गेले होते. त्यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील एका व्यक्तीने त्यांना, चांगलं झालं तुम्ही दाढी ठेवली नाही असे म्हटलं. त्यानं असं म्हणायची वेळ की धनखड यांनी त्यावर जोरदार वाक्य टाकलं आणि आज ते वाक्य माध्यमांमध्ये गाजत आहे. धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. आरोग्याचं कारण त्यासाठी देण्यात येत होतं. पण या वादावर कधीच पडदा पडला नाही. त्यांनी राजीनामा दबावात दिल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांनी केला होता. तर त्यांनी इतक्या झटपट राजीनामा का दिला ही गुपित सत्य कायम चर्चेत आहे. पण ते कधी समोर आलेले नाही. धनखड यांनी याविषयीची अधिकृत भूमिका कधीही मांडली नाही.

दाढीवाल्यांची मला भीती

जगदीप धनखड म्हणाले की दाढीवाल्यांची मला भीती वाटते. दाढीवाला दिसला की मी घाबरून जातो. माझा ओएसडी पण त्याच्या दाढीने मला घाबरवतो, त्यांनी हसत हसत हा संवाद साधला असला तरी त्याची मोठी चर्चा होत आहे. आता धनखड यांनी मनातील सल बोलून दाखवली की खरंच ते हस्यविनोद करत होते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण या त्यांच्या विधानावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची माध्यमात एकच चर्चा रंगली आहे. लोक आता त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तुफान कमेंट्स करत आहेत. त्यांच्या विधानावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

राजकीय तंबूत तुफान चर्चा

मला दाढीवाल्यांची भीती वाटते हे वक्तव्य आता राजकीय तंबूत हस्यविनोदासाठीच नाहीतर चिमटा काढण्यासाठी वापरले जात आहे. राजस्थानपासून ते दिल्लीपर्यंत दाढीवाल्यांची एकच चर्चा सुरू आहे. त्यांचे हे वक्तव्य साधारण मानले जात नाही. जगदीप धनखड यांना काय सुचवायचंय हे लोकांना माहिती आहे. त्यांनी नेमकी नस पकडली याची राजकारणात चर्चा सुरू आहे. त्यांनी दाढीवाल्याच्या आडून कुणावर निशाणा साधला याची चर्चा रंगली आहे. धनखड यांनी होळीपूर्वची धुळवड उडवल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

तर विरोधी खेम्यात धनखड यांच्या वक्तव्याने गुदगुल्या झाल्या आहेत. त्यांना तर आयते कोलीत मिळाले आहे. दाढीवाल्यांची इतकी भीती धनखड यांना कधीपासून वाटू लागली आहे, असा चिमटा विरोधी गोटातून विचारला जात आहे. हा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहचल्याचे समजते. त्यांच्या दाढीवाल्याची भीती हे वक्तव्य दिल्लीतही गाजत असल्याचे समजते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...