AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Whatsapp Web Down : व्हॉट्सॲपमध्ये मोठी तांत्रिक अडचण, युजर्सला मोठा फटका, कसे कराल लॉगिन?

व्हॉट्सॲप वेब सेवा विस्कळीत झाल्यामुळे विशेषतः आयफोन युजर्सना मोठा फटका बसला आहे. अनेक युजर्स क्यूआर कोड स्कॅन न झाल्याने लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वापरू शकत नाहीत.

Whatsapp Web Down : व्हॉट्सॲपमध्ये मोठी तांत्रिक अडचण, युजर्सला मोठा फटका, कसे कराल लॉगिन?
whatsapp app down
| Updated on: Feb 27, 2026 | 11:56 AM
Share

सोशल मीडियावर प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲप वेबमध्ये मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक युजर्सला याचा फटका बसला आहे. आयफोन (iPhone) वापरणाऱ्या युजर्सला याचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांना लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर लॉग इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळपासूनच व्हॉटसअॅप वेबची ही सेवा विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

डाऊनडिटेक्टर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३० वाजल्यापासून आम्हाला अनेक युजर्सने व्हॉटसअॅप वेबमध्ये अडचण असल्याचे सांगितले. यातील ५६ टक्के युजर्सला व्हॉटसअॅप वेब वापरताना अडचणी येत होत्या. तर ३९ टक्के लोकांना ॲपमध्ये, तर ६ टक्के युजर्सला व्हॉटअॅप मेसेंजर वापरताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. यात भारतातील २५ टक्क्याहून अधिक लोक आहेत.

फक्त आयफोन युजर्सला समस्या, अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सेवा सुरळीत

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासूनच व्हॉट्सॲप वेब डाऊन झाल्याची समस्या प्रामुख्याने iOS (iPhone) युजर्सला होताना दिसत आहे. मात्र अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी सेवा सुरळीत सुरू असल्याचे बोललं जात आहे. आयफोन वापरणारे अनेक युजर्स व्हॉट्सॲपचे क्यूआर (QR) कोड स्कॅन केल्यानंतरही लॅपटॉपशी कनेक्ट होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच काही युजर्सला एरर मेसेजही येत आहे. यामुळे जगभरातील लोक त्रस्त झाले आहेत.

या समस्येमुळे हैराण झालेल्या अनेक युजर्सने ट्वीटरवर पोस्ट करत राग व्यक्त केला आहे. यावेळी एका युजर्सने सर्व वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप बंद आहे का? असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने आयफोन लिंक होत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. एकीकडे युजर्सकडून सतत तक्रारी येत असतानाही व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटा (Meta) कडून याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच सध्या डाऊन असलेले व्हॉट्सॲप पुन्हा पूर्ववत कधी सुरु होणार, याबद्दलही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन होत नाही, ही पद्धत वापरा?

  • जर तुम्हालाही व्हॉट्सॲप वेबवर लॉग इन करताना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही वापरत असलेले ब्राऊझर सतत रिफ्रेश करा.
  • तसेच तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असलेला क्यूआर कोड पुन्हा स्कॅन करा.
  • त्यासोबतच जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमचे व्हॉट्सॲप अपडेट केले नसेल तर ते करा. यानंतर पुन्हा प्रयत्न करुन पाहा.
  • यामुळे तुमची समस्या सुटू शकते. तसेच तुम्हाला सहजपणे व्हॉट्सॲप वेब लॉगइन करता येऊ शकते.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं