AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्याचे नेमके महत्त्व, सुख-समृद्धी… काय सांगते ज्योतिषशास्त्र?

Cow First Roti Benefits: हिंदू धर्मात गाईला पहिली भाकरी खाऊ घालणे पुण्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी आणि शांतता नांदते. गाईला भाकरी देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या.

गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्याचे नेमके महत्त्व, सुख-समृद्धी... काय सांगते ज्योतिषशास्त्र?
feeding roti to cow astrologyImage Credit source: social media
| Updated on: Oct 10, 2026 | 10:50 PM
Share

हिंदू धर्मात गाईला पूजनीय मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गाईच्या पोटात 33 कोटी देवी-देवतांचा अधिवास असतो. त्यामुळे गाईला अन्न खाऊ घालणे पुण्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कुटुंबातील अडचणी दूर होण्यापासून ते घरात शांतता नांदण्यापर्यंत गाईला भाकरी खाऊ घालण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. मात्र, ही धार्मिक मान्यता असून त्याला वैज्ञानिक पुरावा असल्याचा दावा करता येत नाही.

गाईला पहिली भाकरी खाऊ घालण्याचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात स्वयंपाक झाल्यानंतर तयार झालेली पहिली भाकरी गाईला खाऊ घालावी. शक्य असल्यास या भाकरीला थोडे तूप आणि गूळ लावून द्यावा. असे केल्याने पुण्य मिळते आणि कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक परिणाम होतो, अशी मान्यता आहे. केवळ सध्याच्या पिढीलाच नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही या पुण्याचा लाभ मिळतो, असे धार्मिक मान्यतेत सांगितले जाते.

गाईला भाकरी देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

धार्मिक मान्यतेनुसार, गाईला भाकरी खाऊ घालताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. गाईला कोरडी किंवा शिळी भाकरी देऊ नये. शक्यतो ताजी भाकरी खाऊ घालावी. दारात भुकेली गाय आल्यास तिला अन्न द्यावे, असेही सांगितले जाते. गाईला भाकरी देण्यापूर्वी ती शांतपणे बसलेली असेल, तर तिला खाऊ घालणे अधिक लाभदायक मानले जाते.

घरातील अशांतता दूर करण्यासाठी काय करावे?

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा अशांततेचे वातावरण असेल, तर दुपारच्या जेवणापूर्वी गाईला पहिली भाकरी खाऊ घालावी. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी श्रद्धा आहे. गाईला भाकरीसोबत गूळ दिल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात, असेही मानले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'