AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! महाराष्ट्रातील आमदार-खासदारांना दिल्लीला बोलावलं; सोमवारी आंदोलनाची हाक?

Delhi Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेस उतरणार आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा मोठा प्लॅन! महाराष्ट्रातील आमदार-खासदारांना दिल्लीला बोलावलं; सोमवारी आंदोलनाची हाक?
| Updated on: Oct 10, 2026 | 11:35 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्या रविवारी काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्य प्रभारी यांची एक मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीतून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एक मोठी रणनीती आखली जाऊ शकते. काँग्रेस सोमवारी (१२ ऑक्टोबर) मोठ्या आंदोलनाची तयारी करत आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले की, भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाबद्दल चिंतित असलेल्या प्रत्येक भारतीयाला आम्ही आवाहन करतो की, सोमवारी दिल्लीत होणाऱ्या भव्य आंदोलनात आमच्यासोबत सामील व्हा. हे आंदोलन मोदी-शाह सरकारने घडवून आणलेल्या देशव्यापी मतचोरीच्या विरोधात आहे.

यासाठी काँग्रेसने आमदार खासदार आणि नेत्यांना दिल्लीत बोलवले आहे. सोमवारी काँग्रेसकडून मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेस आमदार-खासदारांना काँग्रेस हायकमांड यांनी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात काँग्रेस देखील पाठिंबा देणार आहे. यासंदर्भात काँग्रेस हायकमांड यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि खासदारांना दिल्लीत बोलवले आहे.

दिल्लीच्या कनॉट प्लेस (सीपी) येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी विविध ठिकाणी गटागटाने उभ्या असलेल्या तरुणांना हटवले. पोलिसांनी त्यांना एका ठिकाणी एकत्र न जमण्याचा इशाराही दिला. कनॉट प्लेसमध्ये गर्दी जमू नये यासाठी पोलीस आणि निमलष्करी दल सतत पाळत ठेवत होते. आंदोलकांनी रविवारी जंतर मंतरकडे मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत.

लोकशाही आणि मतचोरीविरोधात निदर्शने करण्यासाठी दिल्लीत आलेल्या लोकांना पोलिसांनी जिथे जिथे थांबवले, तिथे आंदोलकांनी आपला विरोध सुरू केला. आंदोलकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलने रोखण्यासाठी व्यापक व्यवस्था केली होती, पण तरीही ते लोकांचा आवाज दाबू शकले नाहीत. याच दरम्यान एसएफआय आणि डीएफआयने उपोषण सुरू केले, पण पोलिसांनी त्यांनाही रोखले.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे