AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना तेलाचा थेंब, ना वाट पाहण्याची गरज! एका दिवसात तयार करा चटपटीत अननसाचं लोणचं

आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, मिरची आणि लिंबाचं लोणचं तर तुम्ही नक्कीच खाल्लं असेल. पण कधी अननसाचं लोणचं खाल्लं आहे का? अननसाचं लोणचं कसं बनवायचं याबद्दल तुम्हाला माहिती देखील नसेल, तर जाणून घ्या अननसाचं लोणचं बनवण्याचा रेसिपी

ना तेलाचा थेंब, ना वाट पाहण्याची गरज! एका दिवसात तयार करा चटपटीत अननसाचं लोणचं
| Updated on: Nov 20, 2026 | 4:23 PM
Share

अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे खायला प्रचंड आवडतात. पण आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, मिरची आणि लिंबाचं लोणचं तर तुम्ही नक्कीच खाल्लंच असेल. पण कधी अननसाचं लोणचं ऐकलं आहे का? सांगायचं झालं तर, भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची लोणची खाल्ली जातात. पण आजकाल लोक आरोग्यदायी अन्न खाण्यास प्राधान्य देतात आणि लोणचं खाणं टाळतात. तर जाणून घ्या एकही तेलाचा थेंब न वापरचा अननसाचे लोणचे कसे बनवाल… जाणून ख्या कसं बनवतात अननसाचं लोणचं…

प्रत्येक लोणचे बनवण्यासाठी तेलाचा वापर केलाच जातो, पण तुम्ही कधी पाण्याने बनवलेलं लोणचं खाल्लं आहे का? हे खास अननसाचं लोणचं पूर्णपणे वेगळं आहे. यासाठी तेलाच्या एका थेंबाचीही गरज नसते. याची चव आंबट, गोड आणि तुरट असून, ती पदार्थांची चव वाढवते. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी तेलविरहित अननसाचं लोणचं बनवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे.

या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे यात मसाले वाटण्याची गरज नाही. हे लोणचे अख्खे मसाले वापरून तयार करता येते. हे बनवण्यासाठी जास्त वेळ किंवा सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. हे लोणचे बनवण्यासाठी तुम्हाला एक मध्यम आकाराचा अननस, साखर, मीठ, वेलची, वेलचीच्या शेंगा, काळी मिरी, मोहरी, लवंग, दालचिनी, जिरे आणि पाणी लागेल. याशिवाय, तुम्हाला काही हिरव्या मिरच्या आणि ताज्या लाल मिरच्या देखील घ्याव्या लागतील. या सर्व घटकांमुळे लोणच्याला आंबट, गोड आणि तुरट चव येईल.

अननसाचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करा. पाणी उकळू लागल्यावर त्यात साखर, मीठ आणि गूळ घाला. नंतर त्यात मेथीचं दाणे, काळी मिरी, मोहरी, लवंग, दालचिनी आणि जिरे घाला. हे सर्व मसाले पाण्यात चांगले उकळवा, जेणेकरून त्यांची चव आणि सुगंध पाण्यात एकजीव होईल.

आता हिरवी आणि ताजी लाल मिरची घ्या. दोन्ही मिरच्या अर्ध्या कापून घ्या, पण त्यांचे दोन वेगळे तुकडे करू नका. या मिरच्या लोणच्याला तिखटपणा देतील आणि अननसाची गोड-आंबट चव संतुलित करण्यास मदत करतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटपणा कमी-जास्त करू शकता. मसाल्याचं पाणी आचेवरून उतरवून पूर्णपणे थंड होऊ द्या. दरम्यान, अननस स्वच्छ धुवून त्याची साल काढा. आता त्याचे लांब काप करा. अननसाचे तुकडे एकसारखे ठेवल्याने ते मसाल्याच्या पाण्यात व्यवस्थित बुडवणं सोपं जाईल.

आता एक स्वच्छ काचेची बरणी घ्या. त्यात अननसाचे कापलेले तुकडे आणि अर्ध्या कापलेल्या हिरव्या व लाल मिरच्या ठेवा. नंतर थंड केलेले मसालेदार पाणी बरणीत ओता. पाण्यासोबत उकडलेले सर्व मसाले त्यात घाला. आता बरणीचं झाकण बंद करा. बरणी किमान एक दिवस तशीच राहू द्या. आंबट-गोड अननसाचे लोणचे दुसऱ्या दिवसापासूनच खाण्यासाठी तयार होईल. ते डाळ, भात, चपाती आणि पराठ्यासोबत खाल्ले जाऊ शकता. अननसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6 , पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे देखील असतात.

Follow Us
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार