AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत सीजेपी मुंबईच्या प्रमुखांना पोलिसांकडून मारहाण; रुग्णालयात दाखल, आंदोलकांवरही गुन्हे दाखल

CJP Protest News: दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद उमटले आहेत. सीजेपीच्या मुंबई प्रमुखांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

दिल्लीत सीजेपी मुंबईच्या प्रमुखांना पोलिसांकडून मारहाण; रुग्णालयात दाखल, आंदोलकांवरही गुन्हे दाखल
| Updated on: Oct 11, 2026 | 12:04 AM
Share

दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि नाना चौक परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीत सीजेपीचे मुंबई प्रमुख प्रणय अहिरे जखमी झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सीजेपीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.

दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सीजेपीचे मुंबई प्रमुख प्रणय अहिरे यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप पक्षाने केला आहे. या मारहाणीनंतर अहिरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सीजेपीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे हात उचलण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा सवालही पक्षाने उपस्थित केला आहे.

सीजेपीने या घटनेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. गणवेश म्हणजे नागरिकांना मारहाण करण्याचा परवाना नसून, कायद्याचे रक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे, असे पक्षाने म्हटले आहे. तसेच, या घटनेमुळे आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबला जाणार नाही आणि हे प्रकरण सोडून दिले जाणार नाही, असा इशाराही पक्षाने दिला आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही निदर्शने करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी ऑगस्ट क्रांती मैदान आणि ग्रँट रोड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. तुषार गांधी यांना आंदोलनस्थळी जात असताना ताब्यात घेण्यात आले. नाना चौक परिसरातही आंदोलकांना रोखण्यात आले आणि अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या कारवाईदरम्यान आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३, १२६(२), १८९(२), १८९(३) आणि १८९(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कलमांचा संबंध सार्वजनिक आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीररीत्या जमाव जमवणे आणि संबंधित परिस्थितीत जमावाच्या सदस्यांच्या जबाबदारीशी असू शकतो.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे