Nagpur : पहिल्यांदा तावडीतून निसटले, आनंदाच्याभरात हवेत गोळीबार केला, पोलिसांनी फिल्मी स्टाईनं पकडलं

ही घटना नागपूरमधील गिट्टीखदान पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिस चौघांची कसून चौकशी करीत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यावरती याच्या आगोदर कुठे गुन्हे दाखल आहेत का ? याची देखील चौकशी होणार आहे.

Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2022 | 1:30 PM

नागपूर – अनेकदा अशा गोष्टी कानावर येतात की त्याने आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अशीच एक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. पोलिसांच्या (Police) एका कारवाई दरम्यानं चौघे नशिबाने निसटले. पण त्यांना इतका आनंद झाला की, त्यातल्या एकाने थेट परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले, त्यांनी पोलिसांना कळवलं. तरूणांनी तिथून पळ काढला पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतलं. ही घटना नागपूरमधील गिट्टीखदान (Gittikhadan) पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे.

नेमकं काय झालं

काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस कारवाईतून वाचल्याचा आनंद चार युवकांमध्ये चांगला संचारला. आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ते एका कारमधून निघाले. धाब्यावर जेवण केलं मद्यप्राशन केलं. नागपुरात परत येताना एका ठिकाणी कार थांबवून गाण्याच्या तालावर नाचायला लागले. अति उत्साहात एकाने स्वतः जवळची लायसन्स असलेली रिवाल्वर काढली. हवेत गोळीबार केला, या गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक चांगलेच हादरले. त्यांनी कंट्रोल रूमला याची माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र तोपर्यंत हे चारही जण त्या ठिकाणावरून निघून गेले होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ते काळ्या रंगाच्या गाडीमध्ये आहे. तसेच गोरेवाडा साईडला गेले असे सांगितल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत त्यांचा शोध घेतला आणि चारही जणांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस चौघांची कसून चौकशी करीत आहेत