Napgur Crime : बंद घर पाहून चोरीसाठी शिरला पण.. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या ?

| Updated on: Oct 10, 2023 | 3:16 PM

कार्यतत्पर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांच्या आतच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या या कारवाईचे बरेच कौतुक होत आहे. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम आणि इतर मुद्देमालही जप्त केला आहे.

Napgur Crime : बंद घर पाहून चोरीसाठी शिरला पण.. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या  ?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील ढगे टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 10 ऑक्टोबर 2023 : एखादा गुन्हेगार कितीही हुशार, चलाख असला तरी तो गुन्हा करून फार काळ लपू शकत नाही. कानून के लंबे हाथ…. गुन्हेगारांना कधी ना कधी पकडतातच. सतर्क पोलिसांमुळे गुन्हेगारांना वचकही बसतो. सध्या नागपूरमध्ये गुन्हेगारीचं (crime in nagpur) प्रमाण प्रचंड वाढलं आहे. लूटमार, दरोडा, चोरी याच्या अनेक केसेस समोर येत आहेत.

अशीच एक घरफोडीची घटना घडल्याचे पोलिसांना समजताच, त्यांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केले. कार्यतत्पर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांच्या आतच गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत त्याला (arrested thief) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून लाखो रुपयांची रोख रक्कम तसेच चोरलेला काही मालही जप्त केला आहे.

कशी केली अटक ?

नागपूरमध्ये हा प्रकार घडला. हसील पोलीस स्टेशन हद्दीत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या घरी चोरी झाली होती. घर बंद असल्याचं पाहून चोराने ती संधी साधली आणि घरात घुसून तीन लाख रुपयांचा माल लंपास केला. चोरी केल्यानंतर तो तिथून लगेचच फरार झाला. याप्रकरणी त्या वृद्ध इसमाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तहसील पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीचा लगेच शोध सुरू केला. त्यासाठी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात आले. एक तरूण फिर्यादीच्या घरात घुसत असतानाचे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले होते.

त्या चोराचा चेहरा समोर येताच पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. आणि चोरीच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याने अनेक चोऱ्या केल्याचे व त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.