Nagpur Crime | नागपुरात 2 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, मकोकाचा आरोपी अभिषेक सिंग अखेर पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: Jun 22, 2022 | 4:31 PM

अभिषेकनं जमानतीसाठी मकोका न्यायालय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, तिथं त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळं तो सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयानं अभिषेकची याचिका रद्द केली. पोलिसांची कारवाई योग्य ठरविली. अभिषेकला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Nagpur Crime | नागपुरात 2 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, मकोकाचा आरोपी अभिषेक सिंग अखेर पोलिसांच्या जाळ्यात
मकोकाचा आरोपी अभिषेक सिंग अखेर पोलिसांच्या जाळ्यात
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : नागपुरात रोशन शेख (Roshan Sheikh) टोळी सक्रिय होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यांना कैदेत टाकले. तीन जणांना जमानत मिळाली. दोन आरोपी फरार होते. त्यापैकी अभिषेकला अटक करण्यात आली. अंकित नावाचा आरोपी अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणारा मकोकाचा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अभिषेक सिंग (Abhikhesh Singh) असे आरोपीने नाव आहे. रोशन टोळीचा तो सदस्य आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा अनेक ठिकाणी शोध घेत होते. गुन्हे शाखेने (Crime Branch) मंगळवारी अभिषेकला अटक केली. सर्वोच्च न्यायालयानं त्याची याचिका फेटाळली. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला.

हप्ता वसुली, अपहरणाचे गुन्हे

रोशन शेख टोळीवर 2020 मध्ये कारवाई करण्यात आली होती. डीसीपी गजानन राजमाने यांनी टोळीवर गुन्हे दाखल केले. या टोळीवर हप्ता वसुली, अपहरण, जमिनीवर कब्जा, महिलांना ब्लॅकमेल करणे असे गुन्हे दाखल होते. या टोळीत अभिषेक सिंह, इरफान खान, अंकित पाली, सलीम काजी, सोहेल बरकाती यांचा समावेश होता. अभिषेक सिंह आणि अंकित पाली हे फरार होते. रोशन, खानू, सलीम व सोहेल यांना अटक करण्यात आली होती. अभिषेक सिंह हा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळं तो दिल्ली, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी नेत्यांसोबत दिसत होता.

अभिषेकची याचिका सर्वोच्च न्यायालयातून रद्द

अभिषेकनं जमानतीसाठी मकोका न्यायालय आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, तिथं त्याला दिलासा मिळाला नाही. त्यामुळं तो सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयानं अभिषेकची याचिका रद्द केली. पोलिसांची कारवाई योग्य ठरविली. अभिषेकला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रोशन टोळीचे चार-पाच जणांना अटक करण्यात आली. रोशन शेख कैदेत आहे. तीन साथिदारांना जमानत मिळाली. मात्र, अंकितचा अद्याप कुठं पत्ता लागलेला नाही. अंकित विरोधद्ध खून व अन्य प्रकारातही गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा