बँकेत मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे सांगून करायचा ‘हे’ काम, वाईट कॉलर ठगाला ‘असा’ केला जेरबंद

बँक लोनच्या शोधात असणाऱ्यांना हेरून त्यांना आपण करोडो रुपयाचं लोन काढून देऊ शकतो, आपल्या बँकेत ओळखी आहेत असं सांगून विश्वासात घ्यायचा. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्चाच्या नावाने पैसे वसुल करायचा.

बँकेत मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे सांगून करायचा हे काम, वाईट कॉलर ठगाला असा केला जेरबंद
बँकेत मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे सांगून करायचा 'हे' काम
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 08, 2022 | 11:05 PM

नागपूर : आपण बँकेचा रिकव्हरी एजंट असून बँकेत मोठमोठे अधिकाऱ्यांसोबत आपली ओळख आहे. आपण कितीही मोठे कर्ज (Loan) असले तरी ते करून देतो अशा प्रकारचे आमिष दाखवत 15 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या वाईट कॉलर ठगाला नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. तो फेब्रुवारी 2022 पासून फरार होता. त्याच्यावर राज्यात अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. रोहित माडेवार असे आरोपीचे नाव आहे.

बँक लोनच्या शोधात असलेल्यांना हेरायचा

नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी एका वाईट कॉलर ठगबाजाला अटक केली आहे. तो स्वतःला बँकेचा रिकव्हरी एजंट, मोठा समाजसेवक असल्याचं सांगायचा. बँक लोनच्या शोधात असणाऱ्यांना हेरून त्यांना आपण करोडो रुपयाचं लोन काढून देऊ शकतो, आपल्या बँकेत ओळखी आहेत असं सांगून विश्वासात घ्यायचा. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्चाच्या नावाने पैसे वसुल करायचा.

4 कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याच्या बदल्यात 15 लाखाला फसवणूक

आरोपीने अशाच प्रकारे 4 कोटी रुपये लोन मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने स्टॅम्प ड्युटीच्या नावावर 15 लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक केली. मात्र लोन झालं नाही. त्यामुळे पीडित व्यक्तीने आरोपी रोहित माडेवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली.

आरोपीवर याआधीही अनेक गुन्हे दाखल

हा सगळा प्रकार फेब्रुवारी 2022 मध्ये घडला होता. तेव्हापासून आरोपी रोहित माडेवार हा फरार होता. त्याला पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. राज्यात त्याच्यावर अनेक ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं आहे. पोलीस आता या व्हाईट कॉलर आरोपीने किती लोकांना अशा प्रकारे ठगलं आहे याचाही तपास पोलीस करत आहेत.