Nagpur Crime | नागपुरात उन्हाचा तडाखा, चोरट्यांनी दोन आईसक्रीमची दुकानं फोडली, वेगवेगळ्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम घेऊन पळाले

| Updated on: Jun 08, 2022 | 3:24 PM

चोरटे पल्सर गाडीनं आले. एकानं दुकानाचं शटर तोडलं. त्यानंतर त्यानं दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. दुसरा बाजूनं दुकानात शिरला. दुकानातील पैसेही त्यांना लंपास केले. चोरट्याने रुमालाने सर्व चेहरा झाकला होता. त्यामुळं त्याची ओळख पटविणं कठीण आहे. या चोरट्याने पैसे चोरल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा फोडून आपला राग काढला.

Nagpur Crime | नागपुरात उन्हाचा तडाखा, चोरट्यांनी दोन आईसक्रीमची दुकानं फोडली, वेगवेगळ्या फ्लेव्हरचे आईस्क्रीम घेऊन पळाले
चोरट्यांनीही दोन आईसक्रीमची दुकानं फोडली
Follow us on

नागपूर : नागपुरात दिवसा असो की रात्री गर्मीचा भयंकर प्रकोप सुरू आहे. या गर्मीच्या दिवसात प्रत्येकाला थंड पेय किंवा आईस्क्रीम हवी हवीशी वाटते. मग अश्यात चोर कसे मागे राहतील. खामला परिसरातील दोन आईस्क्रीमच्या दुकानात एका कपड्याच्या आणि एका फर्निचरच्या दुकानात अश्या चार ठिकाणी एकाच परिसरात चोऱ्या केल्या. महत्वाचं म्हणजे या चोरांनी दोन्ही आईस्क्रीमच्या दुकानातून चोरांनी वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम चोरले. चोरून नेताना ते वितळले असेल की नाही हा वेगळा प्रश्न आहे. मात्र मोठ्या प्रमाणात आईस्क्रीम या चोरट्यांनी चोरले. सोबतच दुकानात असलेले काही पैसे सुद्धा ते घेऊन गेले. घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली. या अज्ञात चोरांचा शोध आता पोलीस घेत आहेत. अशी माहिती धंतोली पोलीस (Dhantoli Police) ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे (Sub-Inspector of Police Savitri Dhage ) यांनी दिली.

चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नागपुरात उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे आईसक्रीम आणि थंड सगळ्यांना हवंहवंसं वाटतं. मग यापासून चोर कसे दूर राहणार. म्हणून चोरट्यांनी चक्क दोन आईस्क्रीमच्या दुकानात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस आता आईस्क्रीम चोरट्यांचा शोध घेत आहेत. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. चोरीची घटना नेहमी होत असल्या तरी कडकडत्या गर्मीच्या काळात आईस्क्रीमची चोरी हा विषय मात्र नागपुरात चर्चेचा ठरत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे फोडले

चोरटे पल्सर गाडीनं आले. एकानं दुकानाचं शटर तोडलं. त्यानंतर त्यानं दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. दुसरा बाजूनं दुकानात शिरला. दुकानातील पैसेही त्यांना लंपास केले. चोरट्याने रुमालाने सर्व चेहरा झाकला होता. त्यामुळं त्याची ओळख पटविणं कठीण आहे. या चोरट्याने पैसे चोरल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा फोडून आपला राग काढला.

हे सुद्धा वाचा

गर्मीवर आईस्क्रीमचा उतारा

उन्हाळा असल्यानं गर्मी खूप होत आहे. थंड पेय पिण्याची, खाण्याची इच्छा होते. त्याशिवाय मन तृप्त होत नाही. उष्णतेतून सुटका व्हावी, यासाठी चोरट्यांनी आता आईक्रीमवर मोर्चा वळविला. चोरांनाही गर्मीपासून मुक्तता हवी आहे. हेच यातून स्पष्ट होते. कुणीही या गर्मीतून सुटला नाहीय.