अमरावतीत 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, पतीकडून बलात्कार, माहेरी आलेल्या लेकीला आईचीच मारहाण

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील 14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात बाल विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

अमरावतीत 14 वर्षीय मुलीचा बालविवाह, पतीकडून बलात्कार, माहेरी आलेल्या लेकीला आईचीच मारहाण
अमरावतीत बालविवाह
Image Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 10:34 AM

अमरावती : अल्पवयीन मुलीचा बाल विवाह (Child Marriage) लावून दिल्यानंतर पतीने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील (Amravati Crime News) अल्पवयीन मुलीचा आई वडिलांनीच विवाह लावून दिला होता. वयाच्या 14 व्या वर्षी मध्य प्रदेशात तिचं लग्न लावून देण्यात आलं होतं. या बाल विवाहानंतर पतीने बालिकेवर बलात्कार (Minor Girl Rape) केल्याची घटना समोर आली आहे. बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या पालकांसह मुलीच्या सासरच्या मंडळींवर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माहेरी आलेल्या मुलीला सासरी जाण्यासाठी आईने मारहाण केल्याचंही पुढे आलं आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील 14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात बाल विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देणाऱ्या आई, मामा, पती, सासरा, लग्न लावून देणाऱ्या व्यक्तीसह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

आई आणि मामाकडून फसवणूक

मध्य प्रदेश राज्यामधील जुन्नरदेव तालुक्यात एक गावात डिसेंबर 2021 मध्ये अल्पवयीन मुलीचा बाल विवाह लावून देण्यात आला होता. अल्पवयीन मुलीची आई आणि तिच्या मामाने फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरी आलेल्या मुलीला मारहाण

पतीकडे अत्याचार होत असल्याने मुलगी माहेरी आली होती. पण आईने पतीकडे जाण्यासाठी मुलीला मारहाण केल्याचाही दावा केला जात आहे.