35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

35 वर्षीय महिलेचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात सापडला. धारणी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय
अमरावतीत शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळला
Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 16, 2022 | 12:33 PM

अमरावती : शेतात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात हा प्रकार घडला. धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड ठेचून या महिलेची हत्या केल्याचा आरोप होत आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेची हत्या कोणी केली, हे अजून समजलेलं नाही. हत्येचं कारणही अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय महिलेचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात सापडला. धारणी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता डोक्यात दगड घालून तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलीसाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या पोलीस पाटलांना घटनास्थळी बोलवण्यात आले आहे, तसेच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. धारणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

प्रेमचा असाही अंत, आधी तिच्या पैशांवर कमाई अन् शेवटी जीव जाईपर्यंत मारहाण, काय घडलं औरंगाबादेत?

कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार