कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार

कार अडवून डोळ्यात मिर्चीपूड फेकली, भर रस्त्यात बिल्डरच्या हत्येचा थरार
बेळगावात बिल्डरची हत्या
Image Credit source: टीव्ही9

भवानी नगरातील संस्कृती पाम्यचे रहिवासी असलेले बांधकाम व्यावसायिक राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर (वय 45, मूळचे रा. हलगा बस्तवाड) यांचा खून झाला. ही घटना मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 15, 2022 | 1:07 PM

विश्वनाथ येळ्ळुरकर, टीव्ही9 मराठी, बेळगाव : बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder) हत्येने बेळगावात (Belgaum Crime) एकच खळबळ उडाली आहे. बिल्डर राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर यांचा भर रस्त्यात खून (Murder) करण्यात आला. राजू कारमधून जात असताना त्यांना थांबवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून चाकूने वार करण्यात आले. बेळगाव मंडोळी रोडवर भवानी नगर भागातील गणपती मंदिराजवळ हत्येचा थरार घडला. राजू दोड्डबोम्मन्नवर यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसंच त्यांची हत्या कोणी केली, हेही समजू शकलेलं नाही.

काय आहे प्रकरण?

भवानी नगरातील संस्कृती पाम्यचे रहिवासी असलेले बांधकाम व्यावसायिक राजू मल्लप्पा दोड्डबोम्मन्नवर (वय 45, मूळचे रा. हलगा बस्तवाड) यांचा खून झाला. ही घटना मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली.

नेमकं काय घडलं?

राजू कारमधून जात असताना त्यांना वाटेत अडवण्यात आले. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकली. त्यानंतर चाकूने वार करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

पोलीस डीसीपी रवींद्र गड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजू यांच्या हत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

भाच्याचं भांडण मामाच्या जीवावर, चुना मागितल्याने दोन गटात राडा, हाणामारीत मामाचा मृत्यू

पोटचा गोळा रोज घरात झिंगायला लागला, आई अन् भावानं त्याचा निकाल लावला

कौटुंबिक वाद टोकाला, प्राध्यापक नवऱ्याकडून पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें