भाच्याचं भांडण मामाच्या जीवावर, चुना मागितल्याने दोन गटात राडा, हाणामारीत मामाचा मृत्यू

जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार या दोघांमध्ये तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन रात्री मारामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्रने मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावून घेतलं होतं.

भाच्याचं भांडण मामाच्या जीवावर, चुना मागितल्याने दोन गटात राडा, हाणामारीत मामाचा मृत्यू
भाच्याचं भांडण सोडवताना झालेल्या वादात मामाची हत्याImage Credit source: सोशल
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 12:02 PM

कोल्हापूर : भाच्याचं भांडण सोडवताना झालेल्या हाणामारीत मामाला प्राण गमवावे लागले. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा (Ruckus) झाला होता. वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. अनिल रामचंद्र बारड (वय 47 वर्ष) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. कुंभारवाडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार या दोघांमध्ये तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन रात्री मारामारी झाली. हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्रने मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावून घेतलं. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होते.

मामावर धारदार चाकूने दोनदा वार

रात्री अकरा वाजताच्या सुमारास मामा-भाचा दोघं जण कुंभारवाडी येथे गेले. त्यावेळी आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकूने अनिल बारड यांच्यावर दोन वेळा वार केल्याचा आरोप आहे. अनिल मामा यांना उपचारासाठी कोल्हापूरला नेले जात होते, मात्र अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आरोपी विकास कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. कोळी आणि पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करत आहेत.

संबंधित बातम्या :

येमेनमध्ये भारतीय महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा, दिल्ली हायकोर्टात याचिका, कसा केला होता मर्डर ज्यानं येमेनसह केरळ हादरलं?

लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला

बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.