लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला

रवीनाने दुरावा राखण्यास सुरुवात केल्याने रणवीर संतापला होता. काही काळापूर्वी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते, मात्र तिने त्याला नकार दिला. याचा राग मनात ठेवून त्याने भर बाजारातच रवीनावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

लग्नाचं प्रपोजल नाकारल्याचा राग, भरबाजारात तरुणीवर हल्ला, बघ्यांमुळे जीव गमावला
दिल्लीत तरुणीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 12:37 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi Crime) बवाना परिसरात एका तरुणीची हत्या (Murder) झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने तरुणीला चाकू भोसकून ठार (Knife Attack) मारण्यात आल्याचा आरोप आहे. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू  झाला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. तरुणीने दुरावा राखण्यास सुरुवात केल्याने आरोपी संतापला होता. काही काळापूर्वी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते, मात्र तिने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. भर बाजारात हा प्रकार घडूनही तिच्या मदतीला कोणीच आलं नाही, गंभीर जखमी झाल्यामुळे तिने जागेवरच प्राण सोडले.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय रवीना (नाव बदलले आहे) ही दिल्लीतील इंदिरा कॉलनीत कुटुंबासोबत राहत होती. काही वैयक्तिक कारणांमुळे तिने शिक्षण मध्येच सोडले. ती घरबसल्या ऑनलाईन कोर्स करत होती.

दोन वर्षांपूर्वी मैत्री आणि प्रेम

सुमारे 2 वर्षांपूर्वी रवीनाची रणवीर नावाच्या तरुणाशी भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. रवीनाचे कुटुंबीय दोघांच्या नात्यावर खूप नाराज होते. याच कारणामुळे रवीनाने हळूहळू रणवीरपासून अंतर राखायला सुरुवात केली.

रवीनाने दुरावा राखण्यास सुरुवात केल्याने रणवीर संतापला होता. काही काळापूर्वी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते, मात्र तिने त्याला नकार दिला.

लग्नाला नकार दिल्याचा राग

शुक्रवारी रात्री रणबीरने रवीनाला घरी बोलावून पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव दिला, पण रवीनाचा नकार कायम होता. याचा राग मनात ठेवून त्याने भर बाजारातच रवीनावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.

बाजारात कोणीच मदतीला नाही

चाकू हल्ल्याच्या वेळी तरुणीला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली.

संबंधित बातम्या :

बायको घराबाहेर पडताच पाठलाग, शेतात नेऊन पतीकडून निर्घृण हत्या

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.