येमेनमध्ये भारतीय महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा, दिल्ली हायकोर्टात याचिका, कसा केला होता मर्डर ज्यानं येमेनसह केरळ हादरलं?

जुलै 2017 मध्ये निमिषीवर येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. निमिषा प्रिया ही तलाल अब्दो महदी  (Mahdi) खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन, पाण्याच्या टाकीत त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोषी आढळली आहे.

येमेनमध्ये भारतीय महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा, दिल्ली हायकोर्टात याचिका, कसा केला होता मर्डर ज्यानं येमेनसह केरळ हादरलं?
येमेनमध्ये केरळच्या नर्सला मृत्युदंडाची शिक्षा
अनिश बेंद्रे

|

Mar 14, 2022 | 11:04 AM

नवी दिल्ली : भारतीय नागरिक निमिषा प्रिया (Nimisha Priya) हिने फाशीच्या शिक्षेविरुद्ध केलेले अपील येमेनच्या (Yemen) न्यायालयाने गेल्या सोमवारी फेटाळले होते. त्यानंतर शनिवारी तिच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. निमिषाने तिचा पासपोर्ट लपवून येमेनमध्ये गुलाम म्हणून ठेवणाऱ्या एका व्यक्तीला सिडेटिव्ह्स (शामक इंजेक्शन) दिली होती. म्हणून तिला हत्या प्रकरणात दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा (death sentence) सुनावण्यात आली, असं ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन कौन्सिल’ने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात राजनैतिक हस्तक्षेप आणि वाटाघाटी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मूळ केरळची रहिवासी असलेली निमिषा प्रिया येमेनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तिचे पती आणि मुलगी 2014 मध्ये भारतात परतले, पण नोकरीमुळे ती येऊ शकली नाही. 2016 मध्ये गृहयुद्धामुळे येमेन देशात ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली.

निमिषावर हत्येचा आरोप

जुलै 2017 मध्ये निमिषीवर येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. निमिषा प्रिया ही तलाल अब्दो महदी  (Mahdi) खून करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन, पाण्याच्या टाकीत त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोषी आढळली आहे.

येमेनची राजधानी सनामध्ये स्वत:चे मेडिकल क्लिनिक सुरु करण्याची तयारी करणाऱ्या निमिषाने महदीची मदत मागितली होती. आखाती देशांतील नियमांनुसार केवळ स्थानिक नागरिकच व्यवसाय सुरु करप शकतात. परदेशी नागरिक किंवा संस्थांना स्थानिकांकडून प्रायोजकत्व मिळवणे आवश्यक आहे.

निमिषा प्रियावर तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकाच्या हत्येचा आरोप आहे. महदीने प्रियाचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी आणि तिच्या हालचाल रोखण्यासाठी सिडेटिव्ह्ज दिल्याचा आरोप आहे. प्रियाने महदीवर अत्याचार आणि छळाचा आरोप वारंवार केला होता, असं अहवालात समोर आलं आहे.

याचिकाकर्त्याचे वकील सुभाष चंद्रन केआर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की येमेनी न्यायालयाने 2020 मध्ये प्रियाचा खटला चालवला होता. त्यानंतर प्रियाने तिच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. मात्र न्यायाधीशांनी तिच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधी हुकली.

याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय?

“सुप्रीम कोर्टात अपील करण्याची आणखी एक संधी अद्याप असली तरी, निमिषा प्रिया 2017 मधील हत्येसाठी कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेपासून बचावण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ कोणत्याही प्रक्रियात्मक त्रुटींमुळे खटल्याच्या निकालावर परिणाम झाला आहे का, हे तपासते, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय क्वचितच बाजूला ठेवते. पीडिताच्या कुटुंबाने ब्लड मनी स्वीकारलं (म्हणजेच पैशांच्या मोबदल्यात आरोपीला माफ करणं) तरच तिला कायदेशीर प्रक्रियांमधून दिलासा मिळेल आणि ती मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचण्याची आशा बाळगू शकते” असं ट्वीट एएनआयने याचिकाकर्त्यांचा हवाला देत केलं आहे.

संबंधित बातम्या :

गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिघांची हत्या, ब्रिटनमधील ‘त्या’ नराधमाला जन्मठेप

सपाचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीची हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें