धक्कादायक ! सपाचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीची हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट

सपा व्यापारी सेलचे सेलचे राज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी बबीता यांचे ब्युटी पार्लर आहे. याच ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलासोबत मिळून हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले.

धक्कादायक ! सपाचे प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीची हत्या, हत्येचे कारण अस्पष्ट
विवाहितेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:52 PM

बिजनौर : गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेले सपा (Samajwadi Party) व्यापार सेलचे राज्य सचिव आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. राजेश अग्रवाल आणि बबीता अग्रवाल अशी मयत जोडप्याची नावे आहेत. हत्या (Murder) केल्यानंतर एका घरात त्यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. ज्या घरात मृतदेह सापडले ते घर सपा नेत्याच्या पत्नीच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचे आहे. सपा व्यापारी सेलचे सेलचे राज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या पत्नी बबीता यांचे ब्युटी पार्लर आहे. याच ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलासोबत मिळून हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Murder of samajwadi party’s state secretary and his wife in bijnaur, motive of murder unclear)

आठवडाभर फोन बंद आल्याने नातेवाईकांनी पोलिसात घेतली धाव

राजेश अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी 28 फेब्रुवारीपासून गायब होते. त्यांना मुलं नाहीत त्यामुळे घरी ते दोघेच असत. यामुळे ते गायब झाल्याचे लगेच कुणालाही कळले नाही. मात्र तब्बल आठवडाभर त्यांचा मोबाईल येत होता. अग्रवाल यांचे नातेवाईक आठवडाभर फोन करत होते मात्र फोन बंद येत होता. यानंतर नातेवाईकांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आल्याने त्यांनी अग्रवाल जोडप्याचा शोध सुरु केला. शिवाय बबली अग्रवाल यांच्या भावानेही सपा पदाधिकाऱ्यांची मदत घेत एसपींची भेट घेतली. यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी अग्रवाल जोडप्यासंदर्भात तपास सुरु केला.

मयत बबली यांच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेने केली हत्या

तपासादरम्यान पोलिस बबली यांच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या रुमा नामक महिलेपर्यंत पोहोचले. रुमावर संशय आल्याने पोलिसांनी तिच्या मुलालाही ताब्यात घेत त्याचीही कसून चौकशी केली. दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अन्य दोन लोकांच्या मदतीने या मायलेकाने अग्रवाल जोडप्याची हत्या केली. त्यानंतर हरीमपूर येथील त्यांच्या घरात खड्डा खणून त्यांना पुरले. पोलिसांनी मायलेकासह त्यांच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक केली आहे. राजेश अग्रवाल हे मूळचे अलीगढचे असून 20 वर्षांपूर्वी त्यांनी कुटुंबाशी संबंध तोडून बिजनौरला स्थायिक झाले होते. त्यानंतर बबली उर्फ बबीता यांच्याशी त्यांनी विवाह केला. दरम्यान, या जोडप्याची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. (Murder of samajwadi party’s state secretary and his wife in bijnaur, motive of murder unclear)

इतर बातम्या

Jharkhand Murder : प्रियकराच्या मदतीने महिलेने काढला पती आणि सासऱ्याचा काटा, वाचा नेमके प्रकरण काय?

Supreme Court : जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे…! सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.