Supreme Court : जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे…! सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण

जून 2021 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने न्यायिक दंडाधिकार्‍यांचा आदेश बाजूला ठेवला होता, ज्यामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपांची दखल घेऊन पत्नीला समन्स बजावण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात पीडितेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Supreme Court : जज साहेब, माझी पत्नी महिला नाही, पुरुष आहे...! सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
सुप्रीम कोर्टात पोचले अनोखे प्रकरण
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 5:39 PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त एक अनोखे प्रकरण पोहोचले आहे. एका व्यक्तीने धक्कादायक आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. त्या व्यक्तीने ज्या महिलेशी लग्न केले, ती त्याची पत्नी महिला नसून चक्क पुरुष आहे. हाच दावा करीत त्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. माझी पत्नी ही महिला नसून पुरुष आहे. त्यामुळे माझी फसवणूक (Fraud) झाली आहे. जज साहेब, मला या प्रकरणात न्याय मिळावा, अशी विनवणी याचिकाकर्त्याने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या याचिकेवर विचार करण्याचे मान्य केले. कथित पत्नीला पुरुषाचे गुप्तांग असल्याने याचिकाकर्त्याची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी फौजदारी खटला चालवला गेला पाहिजे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. (Husband’s petition in supreme court for justice in marriage fraud case)

पत्नीला पुरुष जननेंद्रिय असल्याचा दावा

एशियनेट न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, ही बाब पहिल्यांदा मे 2019 मध्ये समोर आली होती. याचिकाकर्त्या व्यक्तीच्या तक्रारीची ग्वाल्हेरच्या दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने संबंधित कथित पत्नीविरुद्ध फसवणूक केल्याच्या आरोपाची दखल घेतली होती. पीडितेने 2016 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर लगेचच त्याला समजले की त्याची पत्नी ही महिला नसून पुरुष आहे. पत्नीला पुरुषाचे गुप्तांग आहे व ती लग्नासाठी पूर्णपणे अक्षम आहे. त्यामुळे दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. ही बाब कळल्यानंतर याचिकाकर्त्याने ऑगस्ट 2017 मध्ये कथित पत्नी व तिच्या वडिलांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी दंडाधिकार्‍यांकडे धाव घेतली होती.

यापूर्वी प्रकरणावर सुनावणी करण्यास दर्शवली होती असहमती

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास असहमती दर्शवली होती, परंतु न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने कथित पत्नीकडून उत्तर मागितले होते. मात्र याचिकाकर्त्याने पत्नीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर केला. पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय असल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. अविकसित हायमेन हा जन्मजात विकार आहे. त्यामुळे योनीमार्गात अडथळा निर्माण होतो, असा म्हणणे त्याने मांडले. याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील एन. के. मोदी यांनी युक्तिवाद केला. याचिकाकर्त्याची पत्नी पुरुष असल्याचे दिसून आले आहे. हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अन्वये फौजदारी गुन्हा आहे, असाही युक्तिवाद त्यांनी खंडपीठापुढे केला.

जून 2021 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने न्यायिक दंडाधिकार्‍यांचा आदेश बाजूला ठेवला होता, ज्यामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपांची दखल घेऊन पत्नीला समन्स बजावण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात पीडितेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने खंडपीठासमोर युक्तिवाद केला की, पीडितेकडे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत की अपूर्ण हायमेनमुळे पत्नीला स्त्री म्हणता येत नाही.

पत्नीने दाखल केली हुंड्यासाठी छळाची तक्रार

एकीकडे पतीने आपली पत्नी महिला नसून पुरुष असल्याचा दावा केला असताना कथित पत्नीनेही पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात तिने ही तक्रार केली आहे. त्यात तिने पतीने आपल्याला क्रूर वागणूक दिल्याचे म्हटले होते. आता या अनोख्या खटल्यात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Husband’s petition in supreme court for justice in marriage fraud case)

इतर बातम्या

Pune Crime | पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्कारचाआरोप केलेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | काळजाचा ठोका चुकवणारी घटना: दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.