Jharkhand Murder : प्रियकराच्या मदतीने महिलेने काढला पती आणि सासऱ्याचा काटा, वाचा नेमके प्रकरण काय?

ही घटना बागबेडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गांधीनगरमधील आहे. आरोपी महिला दीपा देवी ही एक गांजा तस्कर आहे. तर तिचा प्रेमी जितेंद्र कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधील कानपूरचा असून चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात जमशेदपूरला आला होता. त्यानंतर त्याची महिलेशी ओळख झाली आणि ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले

Jharkhand Murder : प्रियकराच्या मदतीने महिलेने काढला पती आणि सासऱ्याचा काटा, वाचा नेमके प्रकरण काय?
चंद्रपुरात खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.
Image Credit source: टीव्ही9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 12, 2022 | 6:37 PM

जमशेदपूर : प्रियकराच्या मदतीने एका महिलेने पती आणि सासऱ्याची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील जमशेदपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बागबेडा पोलिस गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक (Arrest) केली आहे. दीपा देवी आणि जितेंद्र कुमार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दीपा देवीने हत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, दीपा देवी ही गांजा तस्कर आहे. पोलिस आरोपींची सखोल चौकशी करीत आहेत. (In Jharkhand, a woman murdered her husband and father-in-law with the help of her boyfriend)

हत्या करुन नैसर्गिक मृत्यूचा केला बनाव

ही घटना बागबेडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गांधीनगरमधील आहे. आरोपी महिला दीपा देवी ही एक गांजा तस्कर आहे. तर तिचा प्रेमी जितेंद्र कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधील कानपूरचा असून चार महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात जमशेदपूरला आला होता. त्यानंतर त्याची महिलेशी ओळख झाली आणि ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर दोघांनी मिळून हत्या घडवली. गुरुवारी रात्री दीपा देवीने प्रियकराच्या मदतीने पति राजू मोहंती (40) आणि सासरे सुशील मोहंती (70) यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी बागबेडा पोलिस ठाण्यात पती आणि सासऱ्यांचा अति मद्य सेवन केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली.

मृतदेहाच्या गळ्यावर व्रण दिसल्याने पोलिसांना संशय आला

घटनेची माहिती मिळताच बागबेडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता राजू मोहंतीचा मृतदेह त्याच्या खोलीत तर त्याचा पित्याचा मृतदेह घराजवळच्या त्यांच्या दुकानात आढळला. दीपाने दोघांचा मृत्यू दारुच्या अतिसेवनामुळे झाल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांना दीपाच्या माहितीवर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. तसेच मृतदेहांचे निरीक्षण केले असता मृतदेहांच्या गळ्यावर जखमांचे व्रण दिसले. त्यानंतर पोलिसांनी दीपाला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. (In Jharkhand, a woman murdered her husband and father-in-law with the help of her boyfriend)

इतर बातम्या

Pune Crime | पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्कारचाआरोप केलेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

हरविलेला कुत्रा शोधा नि 50 हजार रुपये कमवा! एकीकडं श्वानप्रेम, तर दुसरीकडं तिरस्कार का?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें