पाणी भरताना हात धरला, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, साडेपाच वर्षांनी आरोपीला शिक्षा

23 नोव्हेंबर 2016 रोजी अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणावर आहे. पीडिता ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अजय दीपक बावणे हा तिथे गेला आणि त्याने पीडितेचा हात पकडला

पाणी भरताना हात धरला, वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, साडेपाच वर्षांनी आरोपीला शिक्षा
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 9:34 AM

वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molestation) केल्या प्रकरणी आरोपीला जवळपास साडेपाच वर्षांच्या कालावधीनंतर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश 1 व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला. वर्ध्यात (Wardha Crime News) नोव्हेंबर 2016  मध्ये ही घटना घडली होती. अजय दीपक बावणे, रा. सोनोरा (ढोक), ता. देवळी, जि. वर्धा असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला कलम 7 आणि 8 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड 2 हजार रुपये अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

23 नोव्हेंबर 2016 रोजी अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणावर आहे. पीडिता ग्रामपंचायतीच्या नळाचे पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी अजय दीपक बावणे हा तिथे गेला आणि त्याने पीडितेचा हात पकडला. त्यामुळे पीडिता घाबरली. तिने झटका देऊन तिचा हात सोडवला आणि घरात धावत गेली.

नेमकं काय घडलं?

त्यानंतर अजय हा पीडितेच्या मागे घरात आला आणि त्याने पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडितेने आरडाओरडा केल्यामुळे आरोपी तिथून पळून गेला होता.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणी सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले.

काय आहे शिक्षा?

आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश 1 व्ही. टी. सूर्यवंशी यांनी निकाल दिला. आरोपीला कलम 7 आणि 8 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.