Wardha Murder | लाडीगोडी लावून शेतात नेलं, डोळ्यात मिरची पूड फेकून काटा काढला, वर्ध्यात शेतकऱ्याची निर्घृण हत्या

| Updated on: Mar 28, 2022 | 8:39 AM

आरोपी प्रमोद भाके याने लाडीगोडी लावली आणि दिनेश महाजन याला शेत शिवारात घेऊन गेला. प्रमोद याने दिनेशच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. संधी साधून त्याच्या डोक्यावर दगड घालून खाली पाडले

Wardha Murder | लाडीगोडी लावून शेतात नेलं, डोळ्यात मिरची पूड फेकून काटा काढला, वर्ध्यात शेतकऱ्याची निर्घृण हत्या
वर्ध्यात शेतकऱ्याची हत्या
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

वर्धा : शेती खरेदी-विक्रीचा वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून (Farmer Murder) करण्यात आला. ही घटना वर्धा जिल्ह्यातील (Wardha Crime) वडनेर शिवारात उघडकीस आली आहे. दिनेश मारोती महाजन (वय 40 वर्ष, रा. वडनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी प्रमोद भाके (वय 60 वर्ष) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दिनेश मारोती महाजन आणि प्रमोद भाके यांच्यात शेतीच्या खरेदी आणि विक्रीच्या कारणावरून वाद होता.

नेमकं काय घडलं?

आरोपी प्रमोद भाके याने लाडीगोडी लावली आणि दिनेश महाजन याला शेत शिवारात घेऊन गेला. प्रमोद याने दिनेशच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. संधी साधून त्याच्या डोक्यावर दगड घालून खाली पाडले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला.

आरोपीचं आत्मसमर्पण

शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणातील प्रमोद भाके याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करत अटक करुन घेतली.

आर्थिक देवाण घेवाणीतून वाद

दिनेश मारोती महाजन याने गावातील प्रमोद भाके याचे पाच एकर शेत विकत घेण्यासंदर्भात सौदा झाला होता. दिनेश याने शेत खरेदी करण्यासाठी मोठी रक्कमसुद्धा दिली होती. मात्र, शेताची आराजी कमी असल्याने दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीतून वाद उफाळून आला.

हा वाद विकोपाला जात प्रमोद भाके याने दिनेशला गाडीवर बसवून शेतात नेले. शेत शिवारात असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला प्रमोदने दिनेशचा काटा काढला.

संबंधित बातम्या :

उधारीने दिलेले पैसे देत नाही म्हणून हत्या, भंडारा शहरातील धक्कादायक घटना

बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्या

पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक