Belgaum Murder : बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्या

मयत महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक कलह होते. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दोघांना एक चार वर्षाचा मुलगा देखील आहे. रोजच्या कलहातूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु होता.

Belgaum Murder : बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्या
बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 10:15 PM

बेळगाव : कौटुंबिक कलहातून भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला (Attack) करुन पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना बेळगावमधील किल्ला तलावाजवळ घडली आहे. हिना कौसर नदाफ (28) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या जोडप्याला एक 4 वर्षाचा मुलगा आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (In Belgaum, a man stabbed his wife to death with a sharp weapon)

दोघा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते

मयत महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक कलह होते. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दोघांना एक चार वर्षाचा मुलगा देखील आहे. रोजच्या कलहातूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु होता. मात्र शुक्रवारी दुपारी अचानक महिलेच्या पतीने किल्ला तलावाजवळ तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

नांदेडमध्ये मुलाकडून जन्मदात्या पित्याची हत्या

किरकोळ घरगुती कारणावरून मित्राच्या मदतीने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना नांदेडमधील धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या बारा तासाच्या आत अटक केली आहे. शंकर बोनगुलवार असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील शंकर बोनगुलवार यांचे प्रेत धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे पटरीवर आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास लावत हत्येच्या या घटनेचा तपास लावला. मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मयताचा मुलगा विठ्ठल आणि त्याचा मित्र काशीराम रॅपनवाडला अटक केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी रेल्वे पटरीवर त्यांचे प्रेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (In Belgaum, a man stabbed his wife to death with a sharp weapon)

इतर बातम्या

Satara Crime : साताऱ्यात 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम अखेर जेरबंद

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.