Nagpur : हत्याकांडातील फरार कैद्याचं 12 वर्षांनी पुन्हा सरेंडर! का? नागपुरातली ही स्टोरी सिनेमाला साजेशी आहे!

| Updated on: Jul 23, 2022 | 12:31 PM

Nagpur News : संजय तेजने याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याखाली त्याला 2003 साली अटक करण्यात आली होती.

Nagpur : हत्याकांडातील फरार कैद्याचं 12 वर्षांनी पुन्हा सरेंडर! का? नागपुरातली ही स्टोरी सिनेमाला साजेशी आहे!
वाचा नेमकं काय प्रकरण?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये (Nagpur Crime News) एक अजबच किस्सा समोर आलाय. एका व्यक्तीला अटक (Nagpur New) झाली. त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यानंतर पेरोलवर बाहेर आलेल्या या कैद्यानं तब्बल 12 वर्षांनी सरेंडर केलंय. 12 वर्ष हा कैदी फरार होता. या कैद्याच्या फरार होण्याचं कारण ऐकून सगळ्यांनाच नवल वाटलंय. आपल्या मुलींच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये, यासाठी तो फरार झाला होता. दरम्यान, मुली शिकल्या. मोठ्या झाल्या. आता मुलींना आयएएस अधिकारी (IAS Officer) व्हायचंय. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. आपल्या मुलींच्या स्वप्नांच्या आड एका गुन्हेगाराचं आयुष्य येण्याआधी या आरोपी पित्यानं पुन्हा स्वतःला पोलिसांच्या हवाले करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार हा कैदी सरेंडरही झाला. ही घटना 12 मे रोजी घडली. पण त्याचा हा रंजक किस्सा आता उघडकीस आला आहे. आजतकचे प्रतिनिधी योगेश पांडे यांनी याबाबतचं वृत्त दिलंय. त्यांच्या रिपोर्टनुसार, या कैद्याला नागपूर सेंट्रल जेलमध्ये आता पाठवण्यात आलं असून 12 वर्षांपासून या 50 वर्षीय आरोपी पित्याला अटक करण्यात आली होती. या कैद्याचं नाव संजय तेजने असल्याची माहिती समोर आली आहे.

12 वर्ष कुठे होता संजय?

आपल्या मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी संजय तेजने हा कैदी जेलमधून बाहेर आला होता. पेरोलवर बाहेर आलेला संजय अनेक दिवस फरार होता. पण आता अखेर संजयने आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करुनच पु्न्हा एकदा सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. संजयच्या मुलींना आयएएस व्हायचंय. आपल्या कोणत्याही चुकीच्या निर्णयमुळे मुलींचं भविष्य खराब गोऊ नये, यासाठी त्याने पुन्हा सरेंडर करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षेत संजयच्या जुळ्या मुलींना 86 आणि 83 टक्के गुण मिळाले होते. मुलीचं भवितव्य चांगलं व्हावं, यासाठी आपण जेलमधून गायब झालो होतो, असं संजयने म्हटलंय. 12 वर्ष संजय नेमका कुठे राहिला, याचाही किस्सा भारीच आहे. संजय हा एका प्रिटिंग प्रेसमध्ये नोकरी करत होते. लपून छपून आपल्या मुलींना भेटायचा. चुकूनही आपला सुगावा कुणाला लागू नये, यासाठी तो फोनवरही कुणाशी बोलला नाही. कुठेही बाहेर पडला नाही. मुलींनी दहावी-बारावी उत्तीर्ण व्हावं, यासाठी तो झटत होता.

हे सुद्धा वाचा

संजय तेजने याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याखाली त्याला 2003 साली अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2010 साली संजय तेजने जेलमधून पेरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तब्बल 12 वर्ष तो फरार होता. अखेर त्यांना आता पुन्हा सरेंडर केलं आहे.