Nagpur Suicide : जेवणाच्या बहाण्याने सामूहिक आत्महत्येचा प्लान! कार पेटवली, स्वतःलाही पेटवून घेतले, पण बायको-मुलगा थोडक्यात वाचला

| Updated on: Jul 20, 2022 | 10:31 AM

Nagpur Suicide Crime News : दुपारी एकच्या सुमारास त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवली.

Nagpur Suicide : जेवणाच्या बहाण्याने सामूहिक आत्महत्येचा प्लान! कार पेटवली, स्वतःलाही पेटवून घेतले, पण बायको-मुलगा थोडक्यात वाचला
नागपूर आत्महत्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : नागपुरात एका व्यावसायिकाने आत्महत्या (Nagpur Suicide) केली. स्वतःची कार या व्यावसायिकाने जाळली आणि जीव दिला. कारमध्ये त्याने स्वतःलाही जाळून घेतलं. ही धक्कादायक बाब नागपूरच्या (Nagpur News) बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खापरी पुनर्वसन परिसरात घडली. या घटनेनं मंगळवारी एकच खळबळ उडाली. या व्यावसायिकाने स्वतः तर आत्महत्या केलीच. पण आपल्या पत्नी आणि मुलालाही (Wife and Son survived) जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पत्नी आणि मुलगा यातून थोडक्यात बचावले. पण तेही जखमी झाले. मात्र व्यावसायिक कारसोबत जिवंत जळाला. यात कारच्या आगीसोबत या व्यावसायिकाचीही राख झाली होती. ही धक्कादायक घटना पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांदेखतच घडली. त्यामुळे त्यांनाही मोठा धक्का बसला. या संपूर्ण घटनेने नागपूर हादरलं असून जखमी पत्नी आणि मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सामूहिक आत्महत्या करण्याच्या इराद्याने या व्यावसायिकाने प्लान केला होता. मात्र तो फसला.

नेमकं काय घडलं?

63 वर्षांचे रामराज गोपाळकृष्ण भट हे जयताळामध्ये राहत होते. त्यांचा नट बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. मात्र कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांचा मुलगा इंजिनिअर होता. पण तो कुठेही काम करत नव्हता. दरम्यान, आर्थिक चणचणीतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे रामराज गोपाळकृष्ण भट यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला जेवणाच्या बाहाण्याचे बाहेर घेऊन जाण्याचा प्लान केला. सामूहिक आत्महत्येसाठी त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेऊ गेले होते.

जेवणाचा बहाणा, आत्महत्येचा प्लान

वर्धा मार्गावरील हॉटेलात जेवण करु, असा बहाणा करत त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेतलं. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवली. भट यांनी पत्नी आणि मुलाला विष दिलं. दोघांनाही संशय आला. नेमकं काय सुरु आहे, हे त्यांना कळायला मार्ग नव्हता. अखेर दोघांनीही रामराज भट यांनी दिलेली गोष्ट पिण्यास नकार दिली. शेवट भट यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलावरही एक विशिष्ट द्रव पदार्थ फवारला. त्या दोघांनाही काही कळायच्या आतच कारही रामराज यांनी पेटवून दिली.

हे सुद्धा वाचा

यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला. कारचा कोळसा होताना पत्नी आणि मुलानं डोळ्यांदेखत पाहिलं. शिवाय रामराज हे देखील आगीत होरपळत होते. पण त्यांनी आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या गंभीर जखमी झालेल्या पत्नी आणि मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातील कर्त्या पुरुषाचा अंत झाल्यानं त्या दोघांवरही मोठा आघात झालाय.