Nagpur Prisoners : कोरोना काळात पॅरोलवर मोकाट सुटलेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी होणार

| Updated on: May 31, 2022 | 8:26 PM

कोरोना संकट टळल्यानंतर नुकतेच या सर्व कैद्यांनी परत तुरुंगात परतावं असे आदेश काढण्यात आले आहेत. नागपूर विभागात त्या आदेशाची मर्यादा 27 मे रोजी संपल्यानंतरही नागपूरच्या तुरुंगातून आकस्मिक अभिवचन रजा मिळालेल्या 496 कैद्यांना पैकी फक्त 130 कैदीच तुरुंगात परतले आहेत. त्यामुळे बहुतांशी कैद्यांनी गृह विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Nagpur Prisoners : कोरोना काळात पॅरोलवर मोकाट सुटलेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी होणार
कोरोना काळात पॅरोलवर मोकाट सुटलेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी होणार
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : मागील वर्षी ज्यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला होता, त्यावेळी राज्यातील कारागृहांमध्ये सुद्धा कोरोनाने धुमाकूळ घातला होता. अनेक कैद्यांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने सर्वच कारागृहातून हजारो कैद्यां (Prisoners)ना आकस्मिक अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल (Parole)वर सोडण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला असताना कारागृह प्रशासनाने कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेल्या सर्व कैद्यांना परत कारागृहा (Jail)त हजर होण्याचे आदेश दिले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता पॅरोलवर मोकाट झालेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नागपूर पोलिसांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत 496 पैकी केवळ 130 कैदीचं तुरुंगात परतले

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील सर्वच कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणातील हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर तुरुंगाबाहेर पाठवले होते. कोरोना संकट टळल्यानंतर नुकतेच या सर्व कैद्यांनी परत तुरुंगात परतावं असे आदेश काढण्यात आले आहेत. नागपूर विभागात त्या आदेशाची मर्यादा 27 मे रोजी संपल्यानंतरही नागपूरच्या तुरुंगातून आकस्मिक अभिवचन रजा मिळालेल्या 496 कैद्यांना पैकी फक्त 130 कैदीच तुरुंगात परतले आहेत. त्यामुळे बहुतांशी कैद्यांनी गृह विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मात्र 496 पैकी केवळ 130 कैदीचं आतापर्यंत तुरुंगात परतले आहेत. उर्वरित 360 कैदी अजूनही मोकाट फिरत असल्याने नागपूर पोलिसांनी आता मोहीम सुरू केली. पोलिसांच्या या मोहिमेला कितपत यश मिळते आणि किती कैदी परत जेलमध्ये जातात हे पाहावं लागणार आहे. (Prisoners who were released on parole during the Corona period will be sent back to jail)

हे सुद्धा वाचा