Nagpur Theft : नागपूरमध्ये बाईक चोरुन मध्य प्रदेशात विकणारा चोरटा जेरबंद

पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून चार गाड्या हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाई तहसिल पोलिस करत आहेत. या आरोपीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत हुशारीने चोऱ्या केल्या.

Nagpur Theft : नागपूरमध्ये बाईक चोरुन मध्य प्रदेशात विकणारा चोरटा जेरबंद
नागपूरमध्ये बाईक चोरुन मध्य प्रदेशात विकणारा चोरटा जेरबंद
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 3:39 PM

नागपूर : मध्य प्रदेशमधून नागपुरात बाईक (Bike) चोरुन मध्य प्रदेशात नेऊन विकणाऱ्या चोरट्याला नागपूर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या चोरट्याकडून चार गाड्या हस्तगत करण्यात आल्या. अतुल सोनावणे (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा चोरटा मध्य प्रदेशमधून नागपुरात यायचा आणि नागपुरात गाड्या चोरुन मध्य प्रदेशात फरार व्हायचा. काही दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या एका चोरीचा तपास करत असताना तहसिल पोलिसांना या चोरट्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. (Thieves arrested for stealing bikes in Nagpur and selling them in Madhya Pradesh)

सापळा रचून पोलिसांनी आरोपीला केले अटक

काही दिवसापूर्वी तहसिल पोलीस स्टेशन हद्दीत होंडा शाईन गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या चोरीचा तपास पोलिसांनी सुरू केला. तपास करत असताना अशाच प्रकारची चोरी गणेश पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी करुन मध्य प्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशाच प्रकारची एक तक्रार गोंदिया पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. यापैकी एका गाडीची नागपुरात विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून चार गाड्या हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाई तहसिल पोलिस करत आहेत. या आरोपीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत हुशारीने चोऱ्या केल्या. मात्र त्याची हुशारी पोलिसांसमोर चालली नाही. (Thieves arrested for stealing bikes in Nagpur and selling them in Madhya Pradesh)