नागपुरात ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड, दोघांना अटक, पावणे सहा लाखांचे ड्रग्ज जप्त

| Updated on: Feb 23, 2021 | 10:54 AM

नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पुन्हा एका ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा (Nagpur Two Drugs Paddler Arrest) भांडाफोड केला आहे.

नागपुरात ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड, दोघांना अटक, पावणे सहा लाखांचे ड्रग्ज जप्त
Nagpur Drug Paddlers
Follow us on

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पुन्हा एका ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा (Nagpur Two Drugs Paddler Arrest) भांडाफोड केला आहे. यांच्याकडे 57 ग्रॅम 22 मिली ग्रॅम एमडी ड्रग पावडर आढळून आले आहे. पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणी सयद सजाद उर्फ सदाम लियाकत अली आणि विवेक दिलीप सांडेकर या दोन आरोपींना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे या कामासाठी आरोपीने एक गाडी सुद्धा खरेदी केली होती (Nagpur Two Drugs Paddler Arrest).

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी यांना गेल्या आठवड्यात त्यांच्या बतमीदाराकडून गुप्त बातमी प्राप्त झाली की, भालदारपूरा येथील रहिवासी सयद सजाद उर्फ सदाम लियाकत अली हा तरुण हा मॅफेडॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेला असून तो मुंबई येथून मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज आणून नागपुरात विकत होता.

पोलिसांना गुप्त माहिती

पोलिसांकडून त्याच्यावर पाळत ठेवली जात असताना 16 फेब्रुवारी रोजी आरोपी सय्यद सज्जाद ऊर्फ सद्दाम लियाकत अली हा विमानाने मुंबईला गेला. तिथे गेल्यावर त्याने कुणालाही संशय येऊ नये म्हणून एक कार खरेदी केली. मुंबईतून मॅफेडॉन (एम.डी.) ड्रग्जची खेप घेतल्यानंतर तो आणि त्याचा सहकारी नागपूरला येत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली (Nagpur Two Drugs Paddler Arrest).

अंमली पदार्थविरोधी पथकाची सापळा कारवाई

नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्ट्री परिसरात सापळा रचून दोघांनाही अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची किंमत ही पावणे सहा लाख रुपये इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय, पोलिसांनी चार मोबाईल आणि कार देखील जप्त केली आहे. यामुळे नागपुरात ड्रॅग्ज तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली का, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

Nagpur Two Drugs Paddler Arrest

संबंधित बातम्या :

वसईत महिलेला झाडाला बांधून मारहाण, आक्षेपार्ह व्हिडीओही बनवल्याने खळबळ

साडीने गळा आवळून पतीची हत्या, 35 वर्षीय महिलेला अटक

धक्कादायक! सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा