साडीने गळा आवळून पतीची हत्या, 35 वर्षीय महिलेला अटक

साडीने गळा आवळून पतीची हत्या, 35 वर्षीय महिलेला अटक
साडीने गळा आवळून पतीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक

पतीच्या व्यसनाधीनतेला कंटाळून साडीने गळा आवळून आपण पतीची हत्या केली, अशी कबुली आरोपी पत्नी सरीता देवीने दिली. (Woman Killing Husband Saree)

अनिश बेंद्रे

|

Feb 23, 2021 | 7:41 AM

नवी दिल्ली : साडीने गळा आवळून पतीचा जीव घेतल्याप्रकरणी राजधानी दिल्लीत महिलेला अटक करण्यात आली आहे. फतेहपूर बेरी भागात राहणाऱ्या 35 वर्षीय सरीता देवी हिने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. (Woman held for Killing Husband strangulating by Saree)

आरोपी पत्नी सरीता देवी पती सिकंदर साहनी याला घेऊन रविवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आली होती. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच डॉक्टरांनी सिकंदरला मयत घोषित केलं होतं. त्याच्या पोस्टमार्टम अहवालात धक्कादायक माहिती समोर आली.

गळ्यावरील खुणांमुळे हत्येचा बनाव उघड

“सफदरजंग रुग्णालयात सिकंदर साहनी याचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र अहवालात त्याच्या गळ्यावर खुणा आढळल्या. त्यामुळे सिकंदरची हच्या झाल्याचं उघडकीस आलं.” अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेसह न्यायवैद्यक विभागाने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर फतेहपूर बेरी पोलिसात तक्रार दाखल करुन तपास सुरु करण्यात आला.

पतीच्या व्यसनाधीनतेला कंटाळून हत्या

तपासात आरोपी पत्नी सरीता देवीने गुन्ह्याची कबुली दिली. पती सिकंदर साहनी याला टीबीचा आजार जडला होता. त्यातही त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. पती आपल्याला मारहाण करुन मुलांसमोर शिवीगाळ करायचा. त्यामुळे साडीने गळा आवळून आपण त्याची हत्या केली, अशी कबुली आरोपी पत्नी सरीता देवीने दिली.

नागपुरात विवाहबाह्य संबंधांतून हत्या

नागपुरात विवाहबाह्य संबंधांवरुन झालेल्या वादातून नवविवाहितेची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांआधी घडली होती. लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नीने ऐकल्यामुळे पतीनेच तिला संपवलं. नागपुरातील एमआयडीसी भीमनगर भागात ही घटना घडली होती. दीप्ती नागमोती असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर अरविंद नागमोती असं आरोपी पतीचं नाव आहे. दीप्ती आणि अरविंद यांचे अवघ्या सव्वा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

भंडाऱ्यात मित्राकडून रुमालाने गळा आवळून हत्या

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मित्राची हत्या केल्याचा प्रकारा भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आरोपीचे मयत तरुणाच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे मार्गातील काटा काढण्यासाठी मित्रानेच मित्राची रुमालाने गळा आवळून हत्या केली.

(Woman held for Killing Husband strangulating by Saree)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें