लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ क्लीप ऐकली, पतीकडून नवविवाहितेची हत्या

दीप्ती नागमोती असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर अरविंद नागमोती असं आरोपी पतीचं नाव आहे. (Nagpur Husband kills wife )

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 9:18 AM, 16 Feb 2021
लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ क्लीप ऐकली, पतीकडून नवविवाहितेची हत्या
नागपुरात पतीकडून नवविवाहित पत्नीची हत्या

नागपूर : नागपुरात विवाहबाह्य संबंधांवरुन झालेल्या वादातून नवविवाहितेची हत्या करण्यात आली. लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नीने ऐकल्यामुळे पतीनेच तिला संपवलं. हत्येनंतर परागंदा झालेल्या पतीचा नागपूर पोलिस शोध घेत आहेत. (Nagpur Husband kills wife over Extra marital affair audio clip with girlfriend)

लग्नानंतर चाळीस दिवसातच हत्याकांड

नागपुरातील एमआयडीसी भीमनगर भागात घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दीप्ती नागमोती असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर अरविंद नागमोती असं आरोपी पतीचं नाव आहे. दीप्ती आणि अरविंद यांचे अवघ्या सव्वा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप समोर

अरविंद नागमोती याच्या लग्नापूर्वीच्या प्रेम प्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नी दीप्ती नागमोती यांनी काही दिवसांपूर्वी ऐकली होती. या ऑडिओ क्लीपमुळे दाम्पत्यात मोठा वाद निर्माण झाला होता. दीप्ती यांनी आपल्या माहेरच्या मंडळींनाही याविषयी कल्पना दिली होती.

उशीने नाक-तोंड दाबून हत्या

या वादातून पती अरविंदने पत्नी दीप्तीची शनिवारी उशीने नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. रविवारी दीप्तीचे कुटुंबीय घरी आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. दीप्तीच्या माहेरच्यांनी तातडीने पोलिसांना याविषयी माहिती दिली.

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती अरविंद नागमोती घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

भंडाऱ्यात मित्राकडून रुमालाने गळा आवळून हत्या

विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मित्राची हत्या केल्याचा प्रकारा भंडारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आरोपीचे मयत तरुणाच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे मार्गातील काटा काढण्यासाठी मित्रानेच मित्राची रुमालाने गळा आवळून हत्या केली. (Nagpur Husband kills wife over Extra marital affair audio clip with girlfriend)

मित्राच्या पत्नीशी प्रेमसंबंध

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हिवरा भागात ही घटना घडली होती. आरोपी राकेश मतारे याचे 26 वर्षीय मित्र अमोल चवलेच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. मात्र अफेअरमध्ये अडसर ठरणाऱ्या अमोलची राकेशने निर्घृण हत्या केली.

रुमालाने गळा आवळून विहिरीत फेकलं

रुमालाने गळा आवळून राकेशने अमोलची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिला होता. अमोल मृतावस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. हत्येप्रकरणी आरोपी मित्र राकेश मतारे याला आंधळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कलम 302, 201 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

विवाहित प्रेयसीसोबत बेडरुममध्ये असताना नवरा दारात, बाल्कनीतून पळताना पडल्याने भंडाऱ्यात प्रियकराचा मृत्यू

मित्राच्या बायकोसोबत विवाहबाह्य संबंध, अडथळा ठरणाऱ्या मित्रालाच संपवलं

(Nagpur Husband kills wife over Extra marital affair audio clip with girlfriend)