AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | दिवसा शंकरपट रात्री ‘हंगामा’, सर्जा राजाच्या नावाखाली नागपुरात विवस्त्र महिलांचा डान्स

नागपूर जिल्ह्यात सर्जा राजाच्या नावावर एक बिभत्स प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी दिवसा शंकरपट आणि रात्री शामियान्यात महिलांचा न्यूड डान्स (Womens Dance) असा किळसवाणा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे.

Nagpur Crime | दिवसा शंकरपट रात्री 'हंगामा', सर्जा राजाच्या नावाखाली नागपुरात विवस्त्र महिलांचा डान्स
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 9:22 AM
Share

नागपूर : मागील अनेक दिवसांपासून बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) बंदी होती. आता न्यायालयाने अशा शर्यतींवरील बंदी उठवली आहे. सध्या राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यती मोठ्य थाटामाटात भरवल्या जात आहेत. मात्र नागपूर जिल्ह्यात सर्जा राजाच्या नावावर एक बिभत्स प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी दिवसा शंकरपट आणि रात्री शामियान्यात महिलांचा न्यूड डान्स (Womens Dance) असा किळसवाणा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे.

दिवसा शंकरपट, रात्री विवस्त्र होऊन महिलांचा डान्स 

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याच्या कुही, उमरेड तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ सुरु आहे. येथे दिवसा शंकरपट भरवला जातो. बैलगाड्यांची ही शर्यत पाहण्यासाठी येथे दिवसा लाखो लोक जमा होतात. मोठ्या थाटामाटात येथे बैलांच्या शर्यती भरवल्या जात आहेत. मात्र रात्र होताच विवस्त्र कपड्यांतील महिलांचा येथे डान्स भरवला जात आहेत. कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये अशा प्रकारच्या डान्सचे आयोजन करण्यात येत आहे.

NAGPUR WOMEN DANCE

महिला अशा प्रकारे डान्स करत आहेत.

100 रुपयात पहायला मिळतो डान्स

या डान्सच्या कार्यक्रमामध्ये डान्स हंगामाच्या नावावर तरुण तरुणी विवस्त्र होऊन डान्स करत आहेत. तसे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. अशा प्रकारचा डान्स पाहण्यासाठी येथे लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. विशेष म्हणजे बिभत्सता दाखवणारा हा डान्स पाहण्यासाठी फक्त 100 रुपये मोजावे लागत आहेत. याच कारणामुळे येथे महिलांचा डान्स बघण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

कारवाई करण्याची नागरिकांची मागणी 

दरम्यान, बैलगाडा आणि शंकरपटाच्या नावाखाली चाललेला हा प्रकार तत्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. तसेच आगामी काळात अशा प्रकारच्या डान्सचे आयोजन केले जाऊ नये त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत. हंगामा डान्सचे काही व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Priyanka Chopra | पाळणा हलला, प्रियंका चोप्रा झाली आई; मुलगा की मुलगी ? चाहत्यांना दिली खास माहिती

Vasai Beaten : वसईत कौटुंबिक वादातून उच्चभ्रू कुटुंबात तुंबळ हाणामारी, घटना सीसीटीव्हीत कैद

Gowandi: अल्पवयीन सफाई कर्मचारीने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, गोवंडीतील धक्कादायक प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.