Nashik Crime | शारीरिक संबंधांना नकार, महिलेला दुसऱ्या नवऱ्याची मारहाण, पहिल्या पतीच्या मुलाला सिगरेटचे चटके

शारीरिक संबंधांना नकार दिल्याच्या रागातून दुसऱ्या पतीने महिलेला मारहाण केली, तर तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला सिगारेटचे चटके दिले. नाशिक रोड भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime | शारीरिक संबंधांना नकार, महिलेला दुसऱ्या नवऱ्याची मारहाण, पहिल्या पतीच्या मुलाला सिगरेटचे चटके
नाशकात चिमुकल्याला मारहाण
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 1:32 PM

नाशिक : महिलेला मारहाण करत नराधम दुसऱ्या पतीने चिमुकल्याला सिगारेटचे चटके देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शारीरिक संबंधांना (Physical Relationship) नकार देणाऱ्या महिलेला तिच्या दुसऱ्या पतीने मारहाण केली. तर महिलेला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला सिगारेटचे चटके दिले. नाशिक शहरात (Nashik Crime News) नाशिक रोड भागात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्यासोबत राहावं, पत्नीपासून मूल व्हावं, असं सांगत बळजबरीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या पतीला नकार दिल्याने महिला आणि मुलाला मारहाण (Beaten up) करण्यात आल्याचा आरोप आहे. चिमुकल्या सावत्र मुलाला सिगारेटचे चटके देण्यात आले. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये महिलेला मारहाण करत तिच्या दुसऱ्या पतीने चिमुकल्याला सिगारेटचे चटके दिल्याची घटना उघडकीस आली आहे. शारीरिक संबंधांना नकार दिल्याच्या रागातून दुसऱ्या पतीने महिलेला मारहाण केली, तर तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला सिगारेटचे चटके दिले.

मारहाणीचं कारण काय?

नाशिक शहरातील नाशिक रोड भागात ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने आपल्यासोबत राहावं, आपल्याला तिच्यापासून मूल व्हावं, म्हणून दुसरा नवरा बळजबरीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दुसऱ्या पतीला नकार दिल्याने त्याने महिला आणि मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

लहानग्याला सिगरेटचे चटके

धक्कादायक म्हणजे चिमुकल्या सावत्र मुलाला नराधमाने सिगारेटचे चटके देण्यात आले. पीडित महिलेने नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं

यवतमाळमध्ये प्राचार्य पदावरुन निवृत्त पत्नीच्या सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू

आधी चहात फिनेल, मग गुलाबजाममध्ये उंदीर मारायचं औषध; नवऱ्याच्या जीवावर उठलेली बायको गजाआड